सौजन्य फोटो - सोशल मिडीया,AI
गुरुवारी वैभवचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबाने तीव्र आक्रोश केला. वैभवच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि पायाला जखमा असल्याने हा आत्महत्येचा नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मृत्यूमागे कुराश संघटनेचा हात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, वैभवने मृत्यूपूर्वी एका मित्राला पाठवलेली ऑडिओ क्लिप समोर आली असून, तिने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “कुराश संघटनेचं रॅकेट उघडकीस आणल्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझा मृत्यू कशाही पद्धतीने झाला तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल,” असे वैभवनं या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये म्हटले होते. या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मूळ बीडचा असलेला वैभव चव्हाण दोन वर्षांपूर्वी धाराशिव पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील होता. २०२४-२५ मध्ये त्याने पोलीस भरतीसाठी खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. मात्र, त्याच्याइतकेच गुण असलेल्या एका अन्य उमेदवाराने खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटली, ज्यामुळे वैभवची भरती होण्याची संधी हुकली. या अन्यायाविरुद्ध त्याने तीव्र पाठपुरावा सुरू केला आणि बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर तब्बल १२ तास ठिय्या आंदोलन केले, त्यानंतर पोलिसांनी योग्य त्या आश्वासनांची पूर्तता करत तपास सुरू केला आहे.
Ans: वैभव चव्हाणचा मृतदेह बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळला.
Ans: वैभवच्या शरीरावर मारहाणीचे वळ आणि पायाला जखमा असून, कुराश संघटनेने घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. तसेच मृत्यूपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.
Ans: वैभवने पोलीस भरती प्रक्रियेत बोगस क्रीडा (खेळाडू) प्रमाणपत्रांच्या आधारे मिळवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर नोकऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते.






