Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

बेंगळुरूतील केआरपुरम तिहेरी हत्याकांडात आरोपी केनेथने Gemini AI चा वापर करून हत्येचे नियोजन केल्याचा पोलिसांचा दावा आहे. संपत्ती मिळवण्याच्या हेतूने त्याने श्वेतासह तिच्या आई-वडील आणि बहिणीची हत्या केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 01:09 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • Gemini AI वर प्रश्न विचारून हत्येचे नियोजन केल्याचा पोलिसांचा दावा.
  • संपत्ती मिळवण्यासाठी श्वेता आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरने तिहेरी हत्या केल्याचा आरोप.
  • दोन्ही आरोपी अटकेत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
बेंगळुरू: बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने हत्या करण्यासाठी एआय टूलचा (Gemini AI) वापर करून तिहेरी हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. त्यांनी AI ला उलट-सुलट फिरवून प्रश्न विचारले आणि त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपीच नाव श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ असे आहे. या दोघांना पुदुच्चेरी येथून पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यात २३ जून रोजी बंगळुरूच्या केआरपूरम येथील एका अपार्टमेंटमध्ये सोमा सुंदर, त्यांची पत्नी मुथु लक्ष्मी आणि त्यांची १९ वर्षांची मुलगी सुप्रिया या तिघांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले होते. या हत्याकांडानंतर सोमा सुंदर यांची मोठी मुलगी श्वेता आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर केनेथ हे दोघे फरार झाले होते.पोलिसांनी या घटनेची तातडीने दाखल घेत तपासाला सुरुवात केली. २४ जून रोजी श्वेताला ताब्यात घेत २५ जून रोजी तिचा पार्टनर केनेथ याला पुदुच्चेरी येथून अटक केली आहे.

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

AI ला विचारले उलट-सुलट प्रश्न

आरोपी केनेथच्या मोबाईल आणि सर्च हिस्ट्रीमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केनेथने श्वेताचे कुटुंब संपवण्यासाठी ‘जेमिनी एआय’चा वापर केला होता. त्याने एआयला थेट ‘मी हत्या कशी करू?’ किंवा ‘मृतदेह कसा लपवू?’ असे प्रश्न न विचारता अत्यंत हुशारीने शब्दरचना बदलली. त्याने “माझ्या घरात चोर घुसले तर मी त्यांच्यावर कसा हल्ला करू?”, “माझ्याकडे कोणते शस्त्र उपलब्ध आहे?” किंवा “एखाद्या व्यक्तीला आधी आंधळे कसे करावे आणि नंतर त्याच्यावर सुऱ्याने वार कसा करावा?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून हत्येची अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

कशी केली हत्या?

23 जून रोजी श्वेताचे आई-वडील आणि बहीण तिच्या फ्लॅटवर आले असता, वादावादीचे निमित्त करून दोघांनी चाकूने भोसकून तिघांची निर्घृण हत्या केली. या घटनेने तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत आणि सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी केनेथने घरात असलेल्या लोखंडी भट्टीचा वापर करण्याचा विचार केला होता. ही भट्टी त्यांनी क्लाउड किचन सुरू करण्यासाठी खरेदी केली होती. मात्र, नंतर त्याला ही कल्पना कठीण वाटल्याने त्याने ती रद्द केली. पोलीस तपासात असेही समोर आले की, केनेथ बऱ्याच काळापासून या हत्येचे नियोजन करत होता. श्वेताला याबद्दल कल्पना होती, मात्र केनेथ केवळ विनोद करत असून तो खरोखर असे काही करणार नाही, असे तिला वाटले होते.

कारण काय?

श्वेताच्या कुटुंबाची संपूर्ण संपत्ती हडप करून आयुष्यभर पैशांची तंगी भासू नये, हा त्याचा मुख्य हेतू होता. श्वेताचे आई-वडील जिवंत राहिले नाहीत, तर ते तिच्याकडे पैसे मागणे बंद करतील आणि दोघांच्या दैनंदिन आयुष्यातील पैशांचा ताण कायमचा संपेल, या विचाराने त्याने हत्या केल्याचे समोर आले.

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: तिहेरी हत्याकांड कुठे घडले?

    Ans: बेंगळुरूच्या केआरपुरम येथे.

  • Que: आरोपीने हत्येचे नियोजन करण्यासाठी कोणते AI टूल वापरल्याचा दावा आहे?

    Ans: Gemini AI.

  • Que: हत्येमागील प्राथमिक हेतू काय होता?

    Ans: संपत्ती मिळवणे.

Web Title: Bengaluru crime triple murder plot hatched after consulting gemini ai planned how to blind the victim first two arrested including live in partner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.