
Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने...
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा शिवा शर्माकडून पैशांची वसुली करण्यासाठी त्याला सतत ब्लॅकमेल करत होती. श्रद्धाने शिवाचे काही आक्षेपार्ह खासगी फोटो काढून ठेवले होते, ज्याच्या जोरावर ती त्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवत होती. ९ ऑक्टोबरच्या रात्री श्रद्धाने शिवाला हजरतगंजच्या ‘अवध ग्रीन अपार्टमेंट’मधील तिच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटवर बोलावलं. तिथे त्याला डांबून ठेवण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला क्रूरतेचा खेळ.
त्या रात्री बंद खोलीत श्रद्धा आणि तिच्या साथीदारांनी शिवाला भयंकर शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. श्रद्धाच्या सांगण्यावरून शिवाचे सर्व कपडे उतरवण्यात आले, त्याला मारहाण करण्यात आली आणि संपूर्ण शरीरावर लिपस्टिकचे डाग लावले गेले. त्याला सर्वांसमोर विनाकपड्यांचे नाचण्यास भाग पाडण्यात आले. तसेच श्रद्धाने शिवाकडून स्वतःचे पाय दाबवून घेत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण करण्यासाठी त्याला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले. शिवाला अशाप्रकारे टॉर्चर करून श्रद्धा यातून मानसिक आनंद म्हणजेच ‘सेडेस्टिक प्लेजर’ घेत होती. हा सगळा प्रकार श्रद्धाने आपल्या बहिणीच्या समोरच केला.
तपासातून समोर आले आहे की, त्या भयानक रात्री फ्लॅटवर श्रद्धा, तिची बहीण रश्मि, ड्रायव्हर दानिश, घरकाम करणारी नोकर महिला आणि श्रद्धाचा खास मित्र आमिर हे सर्वजण उपस्थित होते. मात्र, याआधी पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी आमिरच्या उपस्थितीबाबत लपवाछपवी केली होती. श्रद्धा नेहमीच आपल्या संपर्कांचा आणि बड्या अधिकाऱ्यांसोबतच्या फोटोचा धाक दाखवून लोकांना ब्लॅकमेल करत असे. तिने हे सर्व फोटो एका सीक्रेट पेन ड्राईव्हमध्ये जतन करून ठेवले होते.
पोलिसांच्या मते, श्रद्धा लखनौच्या किसान बाजारमधील एका कॅफेमध्ये आपल्या ग्रुपसोबत हुक्का पिण्यासाठी जात असे. तिथेच ती श्रीमंत मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करायची. शिवा शर्माची आणि श्रद्धाची ओळखही त्याच कॅफेमध्ये झाली होती. दरम्यान, श्रद्धा आणि तिचे साथीदार अटकेत पडताच त्या कॅफेचा मालक दुकान बंद करून फरार झाला आहे. लखनौ पोलीस त्याचा कसून शोध घेत असून हा कॅफे मालकही या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे.
Ans: पोलिसांनी मुख्य आरोपी श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि ड्रायव्हर तनवीर उर्फ दानिश यांना अटक केली आहे.
Ans: आरोपींनी शिवाला नग्न करून मारहाण केली, सिगारेटचे चटके दिले, नाचायला लावले आणि अत्यंत अमानुष व अपमानास्पद शारीरिक-मानसिक टॉर्चर केले.
Ans: लखनौच्या किसान बाजारमधील एका कॅफेमधून श्रद्धा श्रीमंत मुलांना आपल्या जाळ्यात ओढत असे, जिथे शिवासोबत तिची ओळख झाली होती.