
हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी रचला सापळा; पाठलाग करून दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या
ग्रामीण भागातील विविध घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींचा माग काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे १ नोव्हेंबरला इंदापूरच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी घरफोडी, दरोड्यातील आरोपी हे एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचल्यानंतर काही वेळाने दोन दुचाकीवर तिघेजण त्याठिकाणी आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करुन मोबाइल उर्फ हरी पवार याच्यासह अल्वयीनाला ताब्यात घेतले.
दरोडा, जबरी चोरी, ८ घरफोड्या उघडकीस
आरोपींनी ताब्यातील दुचाकी पंढरपूर व करकंब ठाण्याच्या हद्दीतील चोरल्याची कबुली दिली. तसेच खडकी (ता. दौंड) गावात केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मोबाइलही पोलिसांनी जप्त केला. अधिकच्या तपासात आरोपींनी वडगाव निंबाळकर परिसरातही जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी शक्तीमान काळे याला अटक केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी एक दरोडा, जबरी चोरी, ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून १० तोळे वजनाचे दागिने, दोन दुचाकी, मोबाइल जप्त केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, अपर अधीक्षक शुभम कुमार, डीवायएसपी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, एपीआय जीवन मोहिते, उपनिरीक्षक मुलाणी, उपनिरीक्षक सुधीर वाळूंज यांनी केली.
पुणे जिल्ह्यातील विविध भागात घरफोडीसह जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. त्यांनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाने चांगली कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. – संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.
Ans: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोबाइल उर्फ हरी पवार आणि शक्तीमान काळे या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
Ans: आरोपींकडून एक दरोडा, एक जबरी चोरी आणि आठ घरफोड्यांसह एकूण १२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
Ans: पोलिसांनी १० तोळे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी आणि मोबाइल असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.