Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: भंडाऱ्यात संतापाचा उद्रेक! विद्यार्थिनींना दाखवेले अश्लील व्हिडिओ; संतप्त महिलांनी शिक्षकाला चपलेने मारले

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून विकृत चाळे करणाऱ्या शिक्षकाचा प्रकार उघडकीस आला. संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चपलेने मारहाण केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भंडाऱ्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा विकृत प्रकार उघड.
  • विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून वर्गात गैरवर्तन केल्याचा आरोप.
  • संतप्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी शिक्षकाला चपलेने मारहाण केली.
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना आहे ही. वर्गात अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि अश्लील चाळे करायचा. हा प्रकार लक्षात येताच संतप्त गावकरी आणि महिलांनी त्याला भर चौकात चपलेने बदडून काढले. त्यांनतर त्याला पोलिसांना स्वाधीन करून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शिक्षक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी उघडकीस आली.

काय नेमकं प्रकरण?

अनिल जगन राठोड (५४) असे या प्रकरणातील आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी तो या शाळेत बदलून आला होता. वर्ग सुरु झाल्यावर विध्यार्थ्यांना बाहेर काढून तो विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. एवढेच नाही तर, त्यांच्यासोबत वर्गात विकृत चाळेही करायचा. हा प्रकार वाढल्यावर काही विध्यार्थिनीनी पालकांना माहिती दिली. ही वार्ता गावभर पसरताच संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली. काही महिलांनी त्याला शाळेबाहेर काढून या प्रकाराबद्दल विचारणा केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. हे पाहून महिला संतापले आणि त्यांनी त्याला पकडून चपलांनी बडवले. संतप्त गावकर्यांनी आणि पालकांनीही त्याला या कृत्याचा जाब विचारला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Nagpur Crime: सहा महिने दडवलेलं रहस्य उघड! रामटेकमध्ये ढाब्याच्या आवारातून आचाऱ्याचा सांगाडा बाहेर; धक्कादायक प्रकरण समोर

गंभीर आरोप

तक्रारीमध्ये अत्यंत धक्कदायक आणि गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वर्गातील मुलांना वर्गाबाहेर काढून तो मुलींसह दार बंद करून आत असायचा. आशिल्ल्या व्हिडीओ दाखवून नको ते कृत्य करायचा. मागील जुलै महिन्यापासून त्याचा हा प्रकार सुरू होता. नापास करण्याची आणि घरी सांगितल्यास मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देऊन तो हे प्रकार करायचा.

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ कारवाई करत संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jalna Crime: लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी शिक्षकाचे नाव काय आहे?

    Ans: अनिल जगन राठोड (वय 54) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

  • Que: विद्यार्थिनींनी हा प्रकार कसा उघड केला?

    Ans: विद्यार्थिनींनी पालकांना शिक्षकाच्या गैरवर्तनाची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bhandara crime outrage erupts in bhandara teacher shows obscene videos to female students enraged women beat him with slippers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
1

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी
2

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे
3

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ
4

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.