
पंजाबच्या फिरोजपुरमध्ये भीषण अपघात
ट्रक आणि पिकपमध्ये जोरदार धडक
9 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी
Punjab Accident: पंजाबमधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. फिरोजपुर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. फिरोजपूर-फाजिल्का रस्त्यावर पिकअप आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या भीषण दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, जलालाबाद येथील एकाच कुटुंबातील 32 जण पहाटेच्या सुमारास पिकअप गाडीने प्रवास करत होते. त्यांच्या कुटुंबातील एका महिलेचे निधन झाल्याने त्यांच्या अस्थींचे विसराजन करण्यासाठी ते निघाले होते. अपघातानंतर ट्रक चालक गाडी सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे. फरार झालेल्या ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
पहाटेच्या सुमारास त्यांची गाडी फिरोजपूरपासून एका जवळच्या ठिकाणी पोहोचली. तेव्हा समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने पिकअपला धडक दिली. धडक इतकी भयानक होती की पिक-अपच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि प्रवासी आतमध्येच अडकून पडले. अपघात होताच परिसरात बचवकार्य सुरू करण्यात आले. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत.