Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा अंमलीसाठा जप्त

नशा मुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध ठिकाणी छापे मारून करोडो रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 18, 2025 | 02:49 PM
नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा अंमलीसाठा जप्त

नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा अंमलीसाठा जप्त

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई/सावन वैश्य:  नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून, लाखो रुपयांच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत करोडो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून,नशा मुक्त नवी मुंबईच्या दिशेने पोलिसांची वाटचाल सुरू असल्याचं अधोरेखित होत आहे.

नशा मुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व अंमलदार, यांच्यासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध ठिकाणी छापे मारून करोडो रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.

नशा मुक्त नवी मुंबई या जनजागृतीसाठी सुप्रसिद्ध अभिनेते जॉन इब्राहम यांना देखील बोलवण्यात आले होते. जेणेकरून नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांचे मतपरिवर्तन होऊन ते नशेपासून दूर जातील. अशा प्रकारे नवी मुंबईतून अंमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पोलीस नाना प्रकारे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तरी देखील अमली पदार्थाच्या माध्यमातून नवी मुंबईला पोखरणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तर त्यांच्याजवळून करोडो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

नवी मुंबई पोलिसांनी सन2024 मध्ये 13 कोटी

8 लाख 29 हजार 880 रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केलेत, तर 14 कोटी 33 लाख 34 हजार800 रुपयांचे कोकेन देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. 24 लाख 54 हजार रुपयांचे एमडीएमए एक्स्ट्रासी पोलिसांनी जप्त केले, तर 68 लाख 31 हजार 225 रुपये चा गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय. तसेच30 लाख 10हजार रुपयांचे ब्राऊन शुगर पोलिसांनी जप्त केलेत. तर 33 लाख 55हजार रुपयांचे एलएसडी पेपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांनी विविध ठिकाणी मारलेल्या धाडीत 67 लाख 81 हजार रुपयांचे चरस जप्त केले असून, 47 लाख 51 हजार रुपयांचे हेरॉईन देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. तसेच ५५ हजारांचे मेथेडॉन, ३ हजार २६४ रुपयांचे कोडाईन, ४३ हजार ८०० रुपयांचे इतर अमली पदार्थ, त्याचबरोबर १ करोड 28 लाख 32हजार 476 रुपयांचा गुटखा, 1हजार 100 रुपयांचा कोपटा, तर ३ लाख 81 हजार 169 रुपयांचा हुक्का असा एकूण 33करोड 68 लाख 14हजार 244रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

नशा मुक्त नवी मुंबई ठेवण्यासाठी पोलिसांसोबतच शहरातील नागरिकांचे सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. परिसरात अथवा आसपास अशा प्रकारच्या संशयास्पद काही हालचाली आढळून आल्यास, 8828112112 अथवा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Web Title: Big action by navi mumbai police narcotest stock worth lakhs seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Narcotest
  • Navi Mumbai Crime
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय उघडकीस; नेपाळ, थायलंडमधून आणल्या मुली आणि…
1

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत स्पाच्या आड वेश्याव्यवसाय उघडकीस; नेपाळ, थायलंडमधून आणल्या मुली आणि…

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या
2

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या

Mumbai Crime : डोक्यावर वार, गळ्यावर धारदार हल्ला; नवी मुंबईत १७ वर्षीय तरुणीचा काकानेच केली हत्या, कारण काय?
3

Mumbai Crime : डोक्यावर वार, गळ्यावर धारदार हल्ला; नवी मुंबईत १७ वर्षीय तरुणीचा काकानेच केली हत्या, कारण काय?

Crime News : नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; 72 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
4

Crime News : नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; 72 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.