Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! पाणीकपात होणार नाही; आयुक्तांनी सांगितले पाणी बचतीचे नियोजन

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे! राज्य शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या आदेशानंतरही शहरात पाणीकपात होणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. पाणी बचत आणि वितरण व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 24, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • राज्य शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या आदेशानंतरही नवी मुंबईत पाणीकपात होणार नाही
  • २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मोरबे धरणात १६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होता
  • नवी मुंबई शहरात दरमहा सुमारे १४.४० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो
 

 

 

नवी मुंबई शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन, धरणातील पाणीसाठा आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींबाबत महानगरपालिकेत तहकूब महासभेत पाणी जियोजन विषयावर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने सर्व पालिकांना 10 टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. मात्र नवी मुंबई पालिकेत कोणतीही कपात होणार नाही अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यानुसार शुक्रवारी महासभेत पाणी कपात न करण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील व सभागृह नेते सागर नाईक यांनी आयुक्तांना दिले. यावेळी आयुक्तांनी पाणी नियोजनावर भर देत पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले.

आयुक्तांनी मोरबे धरणावर माहिती दिली. धरणाचा एकूण संकल्पित साठा १९० दशलक्ष घनमीटर इतका आहे. २३ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, धरणात १६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. शहरात दरमहा सुमारे १४.४० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो. धरणात ५.५२ दशलक्ष घनमीटर मृत साठा आहे.

Navi Mumbai News : नवी मुंबईत ‘युगंधरा युवती संमेलन २०२६’ उत्साहात संपन्न, महापौर सुजाता पाटील यांचा युवतींना मार्गदर्शन

विभागनिहाय विशेष पथकांची निर्मिती

अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्या खंडित करणे, दंडात्मक कारवाई करणे आणि पाणी गळती रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात विशेष पथके तैनात केली जात आहेत. या पथकांचे नेतृत्व सहायक आयुक्त करणार आहेत.

बांधकाम व कार वॉशिंग सेंटरवर निर्बंध

बांधकाम क्षेत्र, सर्व्हिस सेंटर्स आणि कार वॉशिंग सेंटर्सना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले जात आहे. सर्व विहिरींचे पुनरुज्जीवन करून ते पाणी स्वच्छता गृह, गार्डनिंग व धुण्याच्या कामासाठी वापरले जाणार आहे.

Mira Bhayandar मध्ये ‘मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, The Maharashtra Front’चे बॅनर झळकले; ‘लढा महाराष्ट्रीय धर्माचा’ घोषणेची चर्चा

उद्यानांसाठी प्रक्रिया केलेले पाणी

शहरातील उद्यानांना १०० टक्के एसटीपी प्रक्रिया केलेले पाणीच पुरवले जाणार आहे. वाशी आणि नेरूळ येथील उद्यानांचे राहिलेले प्रकल्पही पुढील दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहेत. जुने १०७ जलकुंभ बदलून ३३ नवीन जलकुंभांची बांधकामे विविध टप्प्यांत सुरू आहेत.

पाणी वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी स्कॉडा प्रणालीमीळे बेलापूर येथे सुरू असलेल्या २४/७ पाणीपुरवठा योजनेमुळे १५ ते २० टक्के पाण्याची बचत अपेक्षित आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबईत १० टक्के पाणीकपात होणार आहे का?

    Ans: नाही. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत पाणीकपात केली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

  • Que: नवी मुंबईत दरमहा किती पाणी वापरले जाते?

    Ans: नवी मुंबई शहरात दरमहा सुमारे १४.४० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो.

  • Que: पाणीगळती रोखण्यासाठी महापालिका काय उपाययोजना करणार आहे?

    Ans: अनधिकृत नळजोडण्या शोधणे, त्या खंडित करणे आणि पाणीगळती रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.

Web Title: Navi mumbai no water cut morbe dam water storage planning pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • Water supply

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : नवी मुंबईत ‘युगंधरा युवती संमेलन २०२६’ उत्साहात संपन्न, महापौर सुजाता पाटील यांचा युवतींना मार्गदर्शन
1

Navi Mumbai News : नवी मुंबईत ‘युगंधरा युवती संमेलन २०२६’ उत्साहात संपन्न, महापौर सुजाता पाटील यांचा युवतींना मार्गदर्शन

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले
2

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले

Navi Mumbai News: ३५ वर्षे जुन्या जलकुंभाची जागा घेणार नवा जलकुंभ; कोपरखैरणेतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
3

Navi Mumbai News: ३५ वर्षे जुन्या जलकुंभाची जागा घेणार नवा जलकुंभ; कोपरखैरणेतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित
4

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.