
फोटो सौजन्य- गुगल
कोपरखैरणे सेक्टर-२३ येथील सिडकोकालीन आणि सुमारे ३५ वर्षे जुना झालेला जलकुंभ कमकुवत असल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन तळस्तरीय आणि उच्चस्तरीय जलकुंभउभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ११ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या कामाच्या निविदेला आर्थिक मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. सेक्टर-२३ येथील जुन्या उच्चस्तरीय जलकुंभाची क्षमता २.५ दशलक्ष लिटर होती.
मात्र, संरचनात्मक तपासणीत हा जलकुंभ कमकुवत झाल्याचे आणि त्याची दुरुस्ती शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो निष्कासित करून नवीन जलकुंभउभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईमार्फत या जलकुंभाचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले होते.
सध्या सेक्टर-२२आणि २३ परिसरात सेक्टर-१८येथून बूस्टिंगद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परिणामी, परिसरातील शेवटच्या टोकावरील सोसायट्यांना कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळत आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन जलकुंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रस्तावानुसार, ०.७५ दशलक्ष लिटर क्षमतेचा तळस्तरीय जलकुंभआणि १.१ दशलक्ष लिटर क्षमतेचा उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात येणार आहे. याशिवाय पंपहाऊस, ऑपरेटर कक्ष, विविध व्यासांच्या जलवाहिन्या आणि व्हॉल्व्ह बसविणे यासह अन्य कामे करण्यात येणार आहेत.
या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात चार निविदा प्राप्त झाल्या. मे. मंगलमूर्ती एंटरप्रायझेस यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा भरली असून, मे. माधवराव एन. काळभोर यांनी७.५० टक्के जादा दराने, तर मे. रिलायन्स कन्स्ट्रक्शन यांनी ९ टक्के जादा दराने निविदा भरली.
मे. एमडी इन्फ्रास्ट्रक्चर यांची निविदा अपात्र ठरली. त्यामुळे मे. मंगलमूर्ती एंटरप्रायझेस यांची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. कामाची निविदा रक्कम ९ कोटी ३७ लाख ३४ हजार६७५ रुपये असून, त्यावर १८ टक्के जीएसटी चे १ कोटी ६८ लाख ७२ २४५ रुपये मिळून एकूण ११ कोटी ६लाख, ६ हजार ९१७ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम पावसाळा वगळून 10 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामाला यापूर्वी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, आता महाराष्ट्र महानगरपालिका स्थायी समितीची वित्तीय मंजुरी घेण्यात येणार आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: कोपरखैरणेतील ३५ वर्षे जुन्या जलकुंभाची जागा नवीन जलकुंभ घेणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेने हा पुढाकार घेतला आहे.
Ans: नवीन जलकुंभामुळे पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होऊ शकतो.
Ans: नवीन जलकुंभामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. मात्र, पाणीटंचाई कितपत कमी होईल हे प्रकल्पाची क्षमता, अंमलबजावणी आणि वितरण व्यवस्थेवर अवलंबून असेल.