Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi Crime: भिवंडी पोलिसांचे मोठे यश, दहा महिन्यांपासून फरार असलेला हत्येचा आरोपी टॅटूमुळे सापडला; इंदूरमधून अटक

भिवंडी पोलिसांना दहा महिन्यापासून फरार असेलल्या आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. परंतु त्याच्या हातावरील टॅटू त्याच्या अटकेचा कारण बनला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 07, 2025 | 12:49 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

भिवंडी: भिवंडी पोलिसांना दहा महिन्यापासून फरार असेलल्या आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. परंतु त्याच्या हातावरील टॅटू त्याच्या अटकेचा कारण बनला. टॅटूने हत्येचे रहस्य उलगडले. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राजू महेंद्र सिंह आहे, जो उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी आहे. २०२४ मध्ये त्याने प्रेमप्रकरणातून एका महिलेची निर्घृण हत्या केली होती आणि तेव्हापासून तो फरार होता. पोलिस त्याचा सतत शोध घेत होते, परंतु आरोपी मोबाईल फोन बंद करून आणि वारंवार त्याचे ठिकाण बदलून पळून जात होता. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात लपून बसला, तर कधी मध्य प्रदेशात पळाला.

अखेर शांती नगर पोलिसांना ठोस माहिती मिळाली. आरोपी राजू हा इंदूरच्या देवास नाका परिसरात लपला आहे. पोलीस पथकाने इंदूर गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचला. त्याला पकडले तेव्हा त्याने आपले नाव ‘सूरज’ असे सांगून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या हातावरील टॅटूने त्याची खरी ओळख उघड केली. अटकेच्या वेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या दक्षतेसमोर त्याचे सर्व युक्त्या अपयशी ठरल्या. आरोपीला भिवंडी येथे आणण्यात आले आणि न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

दरम्यान शांती नगर भिवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी याबाबतची माहिती देतांना म्हंटले की, आरोपी गेल्या १० महिन्यांपासून फरार होता. तो त्याचे ठिकाण बदलत होता आणि पोलिसांना चुकवत होता. तो इंदूरमध्ये लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली.

 

Web Title: Big success of bhiwandi police murder accused who was absconding for ten months was found due to tattoo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Bhiwandi Crime
  • Bhiwandi News
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.