Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, तब्बल १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 12, 2026 | 06:12 PM
परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा!
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
  • परराज्यातून मद्याची बेकायदा वाहतूक भोवली!
Illegal Liquor Transport: परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील बेलापूर-ठाणे मार्गावर सापळा रचून बारा चाकी ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमधून गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या मद्याच्या तब्बल ४८ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या. मद्यसाठा आणि ट्रक असा एकूण १ कोटी ३० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. (Illegal Liquor Transport)

ऐरोली रेल्वेस्थानकासमोर रचला सापळा

बेलापूर-ठाणे मार्गावरून परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोर सापळा रचला.यावेळी चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक (क्रमांक एमएच-१०-एडब्ल्यू-५२९४) संशयास्पदरीत्या जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी ट्रक अडवून वाहनचालकाकडे चौकशी केली.

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

‘ट्रकमध्ये साबणाचे बॉक्स आहेत’; तपासणीत निघाला मद्यसाठा

पथकाने ट्रकमधील मालाबाबत विचारणा केली असता वाहनचालकाने ट्रकमध्ये साबणाचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले. अधिकाऱ्यांनी हे बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये साबणाऐवजी मद्याच्या बाटल्या असल्याचे स्पष्ट झाले. या बॉक्समध्ये गोवा राज्यात निर्मित ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’च्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्या आढळल्या. संबंधित मद्याची महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने नमूद केले आहे.

एक हजार बॉक्समध्ये तब्बल ४८ हजार बाटल्या

ट्रकच्या तपासणीत एकूण एक हजार बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये ४८ हजार मद्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, जप्त केलेल्या बाटल्यांवर बॅच क्रमांक आणि कमाल किरकोळ किंमत (MRP) नमूद नसल्याचेही तपासणीदरम्यान निदर्शनास आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त केला आहे. या कारवाईतील मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३० लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

धुळ्यातील २४ वर्षीय तरुणाला अटक

या प्रकरणी जावेदखान नवाबखान पिंजारी (वय २४, रा. गधडदेव, पोस्ट बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम ६५ (अ), ६५ (ई), ८०, ८१, ८३, ९० आणि १०३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मद्यसाठ्याच्या वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, मद्य कोठून आणण्यात आले आणि ते कोणत्या ठिकाणी पोहोचवण्यात येणार होते, याबाबत पुढील तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाणे-१ चे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव, व्ही. व्ही. सकपाळ तसेच जवान ए. पी. राठोड, हर्षल खरबस, हनुमंत गाढवे आणि अमोल सानप यांनी सहभाग घेतला.

अवैध मद्य वाहतुकीचा पुढील तपास सुरू

परराज्यातून महाराष्ट्रात अवैधरीत्या मद्य आणण्याचा हा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.
साबणाच्या बॉक्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मद्याची वाहतूक होत असल्याचे तपासणीत समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव करीत आहेत. अवैध मद्याच्या वाहतुकीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध आणि मद्यसाठ्याच्या पुरवठा साखळीचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

Web Title: Maharashtra state excise department cracks down on illegal liquor transport one arrested goods worth 1 30 lakh seized sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • crime
  • maharashtra
  • police

संबंधित बातम्या

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
1

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
2

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका
3

मद्यप्रेमींमध्ये खळबळ… Old Monk विक्री थांबली! महाराष्ट्र सरकारलाच बसला 350 कोटींचा फटका

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
4

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.