Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi News : भिवंडीत राजकीय भूकंप! महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद पेटला, समाजवादीच्या ६ नगरसेवकांची जागेवरच हकालपट्टी!

Bhiwandi News : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून समाजवादी पक्षात अंतर्गत वाद उफाळला आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांचे समर्थक मानले जाणारे भरत जंगलानी यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत पक्षाने सहा नगरसेवकांची हकालपट्टी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 14, 2026 | 09:40 PM
abu azmi Bhiwandi municipal

abu azmi Bhiwandi municipal

Follow Us
Follow Us:
  • भिवंडी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद
  • समाजवादी पक्षाने केली सहा नगरसेवकांची हकालपट्टी
  • स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरून काँग्रेसमध्येही मतभेद
 

Bhiwandi News : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून समाजवादी पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचा आदेश डावलून भाजप आमदार महेश चौघुले यांचे समर्थक मानले जाणारे भरत जंगलानी यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत समाजवादी पक्षाने सहा नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे. या कारवाईमुळे महापालिकेतील पक्षांतर्गत मतभेद उघड झाले असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भरत जंगलानी यांच्या नावावरून पक्षात वाद

समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी सहा नगरसेवकांवरील कारवाई जाहीर केली. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये गटनेते आरिब याकूब शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमल उबैद यांचा समावेश आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस केल्याने पक्षनेतृत्व नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार निर्णय न घेतल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईबाबत संबंधित नगरसेवकांची भूमिका समोर आल्यास वादाचं चित्र आणखी स्पष्ट होऊ शकतं.

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! कैलास गायकवाड यांचे निलंबन रद्द, गाडेंची चौकशी होणार

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्येही नाराजी

भिवंडी महापालिकेच्या विशेष महासभेत नऊ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा महापौर नारायण चौधरी यांनी केली. जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये काँग्रेसकडून इम्रान मोहम्मद एच. अन्सारी, अरफात ए. शेख आणि सलीम अहमद शेख यांचा समावेश आहे. भाजपकडून सुगंधा टावरे आणि रवी सावंत, शिवसेनेकडून संजय काबुकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून गिरीश म्हात्रे, समाजवादी पक्षाकडून भरत जंगलानी आणि कोणार्क विकास आघाडीकडून मयूर विलास पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली.

मात्र, या निवडीवरून काँग्रेसमध्येही नाराजी समोर आली आहे. काँग्रेसचे गटनेते तथा उपमहापौर तारिक मोमीन यांनी सुचवलेल्या नावांना शहराध्यक्ष आबिद खान यांनी विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी ही नावे मागे घेण्याची लेखी मागणी केल्याची माहिती आहे.

भिवंडी महापालिकेतील राजकीय गणिताकडे लक्ष

समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी भरत जंगलानी यांच्या जागी सरफराज शेख यांची निवड जाहीर करण्याची मागणी आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केल्याचंही सांगितलं जात आहे.

एकीकडे समाजवादी पक्षातील सहा नगरसेवकांवरील कारवाई, तर दुसरीकडे काँग्रेसमधील नाराजी, यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. पक्षाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो आणि संबंधित नगरसेवकांची भूमिका काय राहते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

Web Title: Bhiwandi news samajwadi party six corporators expelled row vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Bhiwandi News
  • Samajwadi Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.