Bigg Boss fame Divya Shinde Arrest: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Bigg Boss Marthi fame Divya Shinde Arrested: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे पुन्हा वादात सापडली असून यंदा ती मोठ्या प्रकरणामध्ये अडकली आहे. आता मात्र पुणे पोलिसांनी तिला अटक करण्यात आली. एका निवृत्त सरकारी डॉक्टरांच्या घरी घुसून त्यांना मारहाण करून खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर असून काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिला पकडून कोर्टात हजर केली. Bigg Boss fame Divya Shinde Arrest:
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे निवृत्त सरकारी डॉक्टर Government Doctor आहेत. ते ‘करुणादीप फाउंडेशन’ नावाच्या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता.त्या कार्यक्रमाला दिव्या शिंदेला बोलावलं पण नव्हतं, तरी ती तिथे गेली. त्यांनी तिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून बोलायला दिलं. त्यानंतर तिने अजब दावा केला. ती म्हणाली माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे मला 5 लाख रुपये द्या.डॉक्टरांनी घाबरून तिला 50 हजार रुपये ऑनलाइन पाठवले पण. पण 50 हजारांवर ती थांबली नाही, तिला पूर्ण 5 लाख हवे होते.
बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 …
गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास दिव्या शिंदे काही लोकांना घेऊन थेट डॉक्टरांच्या घरी गेली. तिथे गेल्यावर तिने डॉक्टरांना बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तिच्यासोबत आलेल्या लोकांनी घराची तोडफोड पण केली. आणि धमकी दिली की 5 लाख रुपये नाही दिले तर जीवे मारू. असं सगळं FIR मध्ये लिहिलं आहे.
Bigg Boss Marathi 6: कॅप्टन्सीच्या खेळात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा
दिव्या शिंदे आधी रील्समुळे फेमस झाली होती. तिच्या रील्स खूप व्हायरल व्हायच्या, त्यामुळेच तिला बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाली होती.पण बिग बॉसच्या घरात पण तिचं वागणं वादग्रस्तच होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये तिने घरातल्या इतर स्पर्धकांना धमकावलं म्हणून तिला शो मधून बाहेर काढलं होतं. तेव्हा पण ती खूप चर्चेत आली होती.आता या खंडणी आणि मारहाणीच्या केस मुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. एक सोशल मीडिया स्टार असं कृत्य कसं करू शकते, यावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्ट तिला काय शिक्षा देतंय हे बघावं लागेल.






