
crime (फोटो सौजन्य: social media)
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
काय घडलं नेमकं?
पीडित तरुणी आपल्या आजीच्या घरी राहून शिक्षण पूर्ण करत होती. १७ जानेवारीला पीडित तरुणी आपल्या आजीच्या घरातून तिच्या घरात परतत असतांना एका पिपमळाच्या झाडाजवळ आदित्यने रोखलं. तो तिच्याशी बोलण्याचा हट्ट करू लागला. तेव्हा पीडितेने नकार दिला. यावरून आरोपी संतापला त्याने आधी तिला धमकावलं नंतर तिला एक फोटो दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर तिला जाळून टाकणार असल्याचं देखील त्याने सांगितलं.
तेव्हा त्याने मुलीवर पेट्रोल ओतलं आणि पेटलेली काडी तिच्यावर फेकून तिला जिवंत जाळलं. आग लागताच मुलगी ओरडत सुमारे 150 फूट रस्त्यावर धावत गेली आणि काही अंतर गेल्यावर ती खाली कोसळली. तरुणीची परिस्थिती पाहून स्थानिक मदतीला धावले आणि त्यांनी कशीबशी आग विझवली. तिला पटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (एनएमसीएच) येथे दाखल केलं. असा जबाब प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांनी दिला आहे.
या घटनेत पीडितेच्या शरीर जवळजवळ पूर्णपणे जळालं होत आणि ती गेल्या सहा दिवसांपासून तिच्या जीवाशी झुंज देत होती. मात्र २२ जानेवारी २०२६च्या रात्री तिच्या शरीरावरील गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला. अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मृत अल्पवयीन तरुणीने संपूर्ण घटनेचं वर्णन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीचं न्यायालयात आत्मसमर्पण
या प्रकरणातील मृत तरुणीचे वडील दिलीप कुमार यांनी सांगितले की, त्यांची मुलगी दररोज शाळेत जात असताना आरोपी आदित्य तिला नेहमी त्रास द्यायचा. ते म्हणाले की, “माझ्या मुलीला फक्त अभ्यास करायचा होता, पण आरोपीने तिचा साधेपणा आणि शांतता तिची कमजोरी मानली.” या घटनेनंतर, आरोपी आदित्य फरार होता, त्यानंतर त्याने पाटणा शहर न्यायालयात आत्मसमर्पण केलं.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलीस आता पुढील तपास करत आहे. आता पोलीस काय कारवाई करणारे याकडे संपूर्ण बिहारच लक्ष लागलेलं आहे. या घटनेने पुन्हा एक मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Ans: बिहारच्या पाटण्यात गोपालपूर पोलीस ठाणे हद्दीत 17 जानेवारी रोजी ही घटना घडली.
Ans: स्थानिक वॉर्ड नगरसेवक शंभू पासवान यांचा मुलगा आदित्य आरोपी आहे.
Ans: 22 जानेवारी रोजी रात्री उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला.