
Uttar Pradesh : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत महिलेची ओळख ओरियारा गावातील रहिवासी मुंदरी देवी अशी पटली आहे. तिचा भाऊ अजय कुमार याने सांगितले की, बहिणीचे लग्न ८ जून २०२६ रोजी मसौढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरियापूर येथील रहिवासी २४ वर्षीय सत्येंद्र दास याच्याशी करण्यात आले होते. सत्येंद्र दास गुजरातच्या दमण येथे मजूराचे काम करत होता.
सासरच्यांकडून केला जात होता छळ
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधन सणानिमित्त सत्येंद्र दास गुजरातहून घरी परतला होता. तो मुंदरी देवीला तिच्या माहेरी घेऊन आला तेव्हा दोघांचेही कुटुंबाकडून आदराने आणि मान-सन्मानासह स्वागत करण्यात आले. तथापि, कुटुंबाचा आरोप आहे की, मुंदरी देवीला सासरकडून त्रास दिला जात होता.
हुंड्यासाठी केली हत्या
भाऊ अजय कुमार याने सांगितले की, मंगळवारी बहिणीची तब्बेत खराब झाल्याची त्याला माहिती मिळाली. माहिती मिळताच कुटुंबिय उशीरा रात्री बहिणीच्या सासरी पोहचले. तिथे पोहचल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजावर टाळा बसवल्याचे आढळले. आजूबाजूच्या लोकांची चाैकशी केल्यानंतर त्यांना समजले की, मुंदरी देवीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाला घरामागील दर्धा नदीजवळ जाळण्यात आले आहे. माहिती मिळताच अजय कुमार आणि कुटुंबिय लगेच नदीजवळ पोहचले. तिथे त्यांना मुंदरी देवीची चिता जळत असल्याचे दिसले. अजय कुमारने सांगितले की, मृतदेह ज्या ठिकाणी जाळला जात होता ते ठिकाण काही स्मशानभूमी नव्हते. असं असताना, सासरच्या लोकांनी गुपचूप नदीजवळ मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनेस्थळी दाखल होत जळत्या चितेतून एकूण ६ अवशेष आपल्या ताब्यात घेतले आहेत. या अवशेषांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सासरच्यांकडून ४ लाखांची मागणी
मृताच्या भावाने आणि कुटुंबाने आरोप केला की, मुंदरी देवी ६ महिन्यांची गरोदर असून सासरच्या लोकांनीच मिळून तिची हत्या केली आहे. कुटुंबाने आरोप लावला की, सासरच्या मंडळींनी हत्या करुन पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला जाळून टाकले. याबरोबरच मुंदरी देवीचा सासरच्यांरडून छळ होत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यांनी आरोप लावला की, नवऱ्यासह सासरच्यांकडून ४ लाखांची मागणी केली जात होती. अशात पैसे न दिल्यामुळे सर्वांनी मिळून मुंदरी देवीची निघृण हत्या केली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कुटुंबिय आणि आपरिसरातील रहिवाशांची चाैकशी केली जात आहे. शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आल्यानंतरच मृत्यूचे खरे समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.