Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना गेले चार महिने गुंगारा देणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 06:18 PM
गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' भागात सापळा रचून पकडले

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' भागात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
  • म्हाडा वसाहतीत सापळा रचून पकडले
  • पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना गेले चार महिने गुंगारा देणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अजय पोपटराव पाडुळे (वय ३०, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव,उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मितेश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

पाडुळे आणि त्याचा साथीदार चारुदत्त चव्हाण यांच्याविरुद्ध गांजा तस्करी प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. चव्हाण याच्याकडून ३५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळे पसार झाला. तपासात पाडुळे हा पुणे शहरात गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. गेले चार महिने तो पोलिसांना सापडत नव्हता. पाडुळे याने वेशभूषा बदलली होती, तसेच तो समाज माध्यमाचा वापर करत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण आली होती.

पाडुळे हा म्हाडा वसाहतीत आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पाडुळे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, लोणी काळभोर, वानवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, तो या गुन्ह्यात पसार होता.

हे सुद्धा वाचा : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, नियमांचे उल्लंघन करणारे डीजे जप्त करणार; बारामती तालुका पोलिसांचा इशारा

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला

रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे. अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पुणा गेस्ट हाऊस, बुधवार पेठ)  असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. रॉकी रणजित पात्रौ तसेच विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: The police have arrested an accused person who had absconded in a cannabis smuggling case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
1

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
2

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
3

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना
4

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.