Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्धीकींच्या हत्येची जबाबदारी; सोशल मीडियावर पोस्ट व्हारल

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम आणि सलमान खान यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 13, 2024 | 02:30 PM
बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्धीकींच्या हत्येची जबाबदारी; सोशल मीडियावर पोस्ट व्हारल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दीक यांची शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केल्याचे सांगितले आहे, तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम आणि सलमान खान यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अनुज थापनचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. जाणून घेऊया कोण आहे अनुज थापन, ज्याचे नाव या प्रकरणात समोर आले आहे.

हेही वाचा: देशाला धोका असेल तर न डगमगता मोठी पावले उचलू… शस्त्रपूजनावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

  कोण आहे अनुज थापन?

14 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील वांद्रे भागात सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी विकी गुप्ता (24) आणि सागर पाल (21) या दोन्ही आरोपी शूटरना गुजरातमधून अटक केली होती. यानंतर पोलिसांनी सोनू कुमार, चंदर बिश्नोई आणि अनुज थापन (23) यांना पंजाबमधून शस्त्र पुरविण्याच्या गुन्ह्यात अटक केली. अटकेनंतर काही दिवसांनी अनुज थापनने लॉकअपच्या टॉयलेटमधील पत्र्याला फास लावून गळफास लावून घेतला होता.

अनुजने तुरुंगातील शौचालयातील पत्र्याला फास लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी आपल्या जबानीत म्हटले आहे. यानंतर त्याला शासकीय जीटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनुज थापन हा मूळचा पंजाबचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज थापनवर खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह गंभीर कलमान्वये तीन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर धावू लागली, लोकांचा उडाला थरकाप, Video Viral

शुभू लोणकर महाराष्ट्र नावाच्या युजरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते, परंतु तू आमच्या भावाला उद्ध्वस्त केले. बाबा सिद्दीकीची शालीनता जी आज उद्ध्वस्त होत आहे, ती एकेकाळी दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होती. त्यांचे (बाबा सिद्दिकींचे) मृत्यूचे कारण अनुज थापनला बॉलीवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे होते, परंतु जो कोणी सलमान खान आणि दाऊद गँगला मदत करेल तो जर त्याला मारला गेला तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ.

 

Web Title: Bishnoi gang took responsibility for baba siddiquis murder nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • baba Siddique
  • crime news
  • Siddhu Musewala

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.