Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP leader Viral Video: भाजप नेत्याने हायवेवरच सुरू केलं अश्लील कृत्य; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या या व्हिडिओमध्ये धाकड एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून, हा व्हिडिओ कथितपणे १३ मे रोजी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर चित्रित झाल्याची माहिती आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 24, 2025 | 10:32 AM
BJP leader Viral  Video: भाजप नेत्याने हायवेवरच सुरू केलं अश्लील कृत्य; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

मंदसौर :  मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील काही नेते सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चत आले आहेत. मोहन यादव सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. हे असतानाच मध्यप्रदेशातील आणखी एका नेत्याचे काळे कारनामे समोर आले आहेत. मंदसौर जिल्ह्यातील भाजप नेते मनोहर धाकड यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून लोकांमध्ये मनोहर धाकड कोणत्या पदावर आहेत आणि पक्षात त्यांचा स्थान काय आहे,याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मनोहर धाकड यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. मनोहर धाकड यांच्या गळ्यात भाजपचा बिल्ला असताना, त्यांच्या सोबत त्यांची पत्नीही दिसत आहे. दरम्यान पक्षाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील रहिवासी मनोहर धाकड सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या या व्हिडिओमध्ये धाकड एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून, हा व्हिडिओ कथितपणे १३ मे रोजी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर चित्रित झाल्याची माहिती आहे. व्हिडिओतील पांढऱ्या रंगाची कार परिवहन विभागाच्या नोंदीनुसार मनोहर धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

या प्रकरणानंतर, धाकड हे भाजपचे नेते असल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला. मात्र, भाजपने यावर तात्काळ प्रतिक्रिया देत प्रेस नोट जारी केली आणि मनोहर धाकड यांना पक्षाचे कोणतेही अधिकृत पदधारक किंवा सदस्य असल्याचे नाकारले. मंदसौर जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले की, “मनोहर धाकड हे भाजपचे प्राथमिक सदस्यही नाहीत.”

पत्नी भाजपमध्ये सक्रिय, तरीही कारवाईस टाळाटाळ

मनोहर धाकड यांचे पक्षाशी अधिकृत संबंध नसले तरी त्यांच्या पत्नी सोहनबाई धाकड या भाजप समर्थित जिल्हा पंचायत वॉर्ड क्रमांक ८ मधील सदस्या आहेत. याशिवाय, त्या भाजप महिला मोर्चाच्या विभागीय उपाध्यक्षपदावरही कार्यरत होत्या. मात्र, प्रकरण समोर आल्यानंतरही त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या टाळाटाळीमागे जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. मंदसौर जिल्हा पंचायतीत एकूण १७ सदस्य असून त्यापैकी ९ भाजपचे आणि ८ काँग्रेसचे आहेत. अशा परिस्थितीत, सोहनबाई यांच्यावर कारवाई केल्यास भाजपला बहुमत गमवावे लागू शकते. सध्या जिल्हा पंचायत अध्यक्षा माजी आमदार राधेश्याम पाटीदार यांच्या सून दुर्गा पाटीदार आहेत. व्हिडिओ प्रकरणावर भाजपने स्वतःला वेगळे करून घेतले असले, तरी धाकड दाम्पत्याचा राजकीय संपर्क आणि सामाजिक ओळख लक्षात घेता, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

 

Web Title: Bjp news bjp leader started obscene act on highway objectionable video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • BJP
  • crime news
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन
1

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण
2

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली
3

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
4

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.