crime (फोटो सौजन्य : social media)
जयपूरमध्ये एका घरात विवाहित जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांनीही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण या दोघांची हत्या तर झालेली नाही ना? असा पैलू तपासला जात आहे. शुक्रवारी या दोघांचे मृतदेह जयपूर या ठिकाणी असलेल्या मूहाना या भागात त्यांच्याच घरात सापडले. गुरुवारी या दोघांचे भांडण झाले होते याचा सीसीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे.
घरात आढळला मृतदेह
मृतकाचे नाव धर्मेंद्र आणि सुमन आहे. धर्मेंद्र बँकेत काम करत होता आणि सुमन ही गृहिणी होती. या दोघांना दोन मुली आहेत. त्यापैकी एक ११ वर्षांची आहे तर दुसरी आठ वर्षे वयाची आहे. धर्मेंद्र कामावर आला नाही त्यामुळे त्याच्या बँकेतील मॅनेजरने त्याला फोन केला. मात्र धर्मेंद्रने एकही फोन उचलला नाही. त्यांनतर त्याच्या एका मित्राला धर्मेंद्रच्या नातेवाईकांनी धर्मेंद्रच्या घरी पाठवलं. मित्र त्यांच्या घरी गेला आणि तेव्हा त्याला या दोघांचे मृतदेह घरात आढळून आले. यांनतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घरी पोहोचेले आणि पोलिसांनी या घटनेसंदर्भात इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्यात पोलिसांना कळलं की गुरुवारी दुपारी हे दोघंही पार्किंगच्या भागात काहीतरी कारणावरुन वादावादी करत होते. या दोघांनी आत्महत्या केल्याचं अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या दोघांमध्ये वाद नेमका का झाला ते स्पष्ट झालेले नाही आहे.
काय आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमन तिचा नवरा धर्मनेदरला कारणे बाहेर जाण्यापासून अडवत होती. त्यावेळी त्याने सुरु केलेली कार थांबवली आणि त्याचवेळी या दोघांचा वाद झाला. त्यानंतर सुमनने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि त्याचा हात धरला. या सगळ्यानंतर दोघंही कारच्या बाहेर आले. त्यावेळी धर्मेंद्रचा हात सुमनच्या खांद्यावरच होता असं या फुटेजमध्ये दिसतं आहे. तसंच आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी एकत्र इमारतीत शिरताना दिसत आहेत. यावेळी सुमनकडे एक बॅग होती असंही दिसतं आहे. हे दोघं जवंत असतानाचं हे शेवटचं फुटेज आहे असं पोलिसांनी सांगितलं.
सुमनच्या वडिलांची मागणी
धर्मेंद्रच मित्र म्हणाला की या दोघांनी अर्थी कारणांमुळे आत्महत्या केली असेल असं वाटत नाही. सुमनच्या वडिलांनी म्हंटले आहे की सुमनच्या शरीरावर काही जखमांचे वर्ण दिसत आहे. त्यामुळे तिची आणि जावयाची हत्या झाली असावी या अनुषंगाने तपास केला गेला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी आत्महत्या केली असं प्राथमिक अंदाज आहे. पण या दोघांची हत्या तर झालेली नाही ना? असा तपस केला हजार आहे. कारण दोघांची आर्थिक स्थिती चांगली होती.