crime (फोटो सौजन्य : social media)
पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी (वय ४० ) आणि महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीचा मृदेह दरीत आढळून आला आहे. दुर्गवाडी कोकणकड्याच्या १३०० फूट खोल दरीत त्यांचे मृतदेह सापडले आहे. प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांना या दोघांच्या मृतदेहाजवळ सुसाईडनोट सापडला आहे. त्यामध्ये दोघांनी आपल्या आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.
माझा भाऊ डॉन, तो डायरेक्ट मर्डर करतो, नागरिकांना धमकी; दारू पिऊन तरुणींचा रस्त्यावर धिंगाणा….
चिठ्ठीत काय?
रामचंद्र पारधी यांनी चिठ्ठीत लिहिले आहे की, “मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागतो. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा.” तर रुपाली खुटाण हिनेदेखील आपल्याला आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
१३०० फूट खोल दरीत सापडले मृतदेह
या दोघांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना बोलावून चौकशी केली जात आहे. रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण या दोघांचे मृतदेह तब्बल 1३00 फूट खोल दरीत पडले होते. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने अत्यंत बिकट परिस्थितीत प्रयत्नांची शर्थ करुन हे मृतदेह दरीतून वर आणले होते. जुन्नरच्या रिव्हर्स वॉटरफॉलजवळ त्यांनी आपली कार उभी केली होती. काही दिवसांपासून ती कार उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकरावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या होत्या. त्यानंतर दरीत शोध घेतल्यावर दरीत मृत देह सापडले.
रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कार लॉक केली होती. ही कार टोईंग करुन जुन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. ही कार उघडल्यानंतर पोलिसांना त्यामध्ये आणखी काही पुरावे मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
केवळ 2 हजार रुपयांसाठी कामगाराने जाळले मालकाचे दोन ट्रक; आधी दारू प्यायला अन् नंतर…