
मोठी बातमी! पंजाबमध्ये हायअलर्ट; शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी, 'या' शहराला छावणीचे स्वरूप
अमृतसरमधील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
अमृतसर शहराला आले छावणीचे स्वरूप
शाळांमधून शिक्षक, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश
Bomb Threat In Amritsar: पंजाबमधून (Punjab) एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील अमृतसर शहरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. बॉम्बने (bomb Threat) उडवण्याची धमकी प्राप्त होताच शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बची धमकी मितळच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य पाहता प्रशासनाने सरकारी आणि खाजजीआय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले. शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिस दाखल झाले आहेत. तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस कमिश्नर यांनी शहरवासीयांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी
पंजाबमधील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त होताच, खळबळ उडाली. पोलिस हा ईमेल कुठून आला याचा तपास करत आहेत. तसेच अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतसर शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक शाळेची तपासणी करत आहे.
ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना बॉम्ब स्फोटाची धमकी
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या तीन विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांना मिळालेल्या ईमेलमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. धमक्या मिळालेल्या विमानांमध्ये केरळमधील कन्नूरहून हैदराबादला जाणारी इंडिगोची फ्लाइट 6E-7178, फ्रँकफर्टहून हैदराबादला जाणारी लुफ्थांसाची फ्लाइट LH-752 आणि लंडनहून हैदराबादला जाणारी ब्रिटिश एअरवेजची फ्लाइट यांचा समावेश होता.
Bomb Threat News: इंडिगो, लुफ्थांसा आणि ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना बॉम्ब स्फोटाची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही विमानांना शमशाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मानक प्रोटोकॉलचे पालन करून, विमानतळ अधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि सुरक्षा तपासणीसाठी त्यांना आयसोलेशन विभागात हलवण्यात आले. याशिवाय बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकासह सुरक्षा पथकांनीदेखील तिन्ही विमानांची कसून तपासणी केली. विमानतळ परिसरात अतिरिक्त CISF सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तथापि, ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.