Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियकराने प्रेयसीचा खून करून प्रेत नाल्यात टाकले; पोलिसांची केली दिशाभूल

उत्तर प्रदेशातील तरुणीचा वसईत खून करून तिचे प्रेत नाल्यात टाकणाऱ्या प्रियकराला गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने तिचा मोबाईल राजधानी एक्सप्रेसमध्ये टाकला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2025 | 07:50 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वसई येथे उत्तर प्रदेशातील तरुणीचा खून करून तिचे प्रेत नाल्यात टाकणाऱ्या तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा मोबाईल राजधानी एक्सप्रेसमध्ये ठेवणाऱ्या प्रियकराला गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News : हत्यारांचा धाक दाखवून नागरिकांची लूट; आरोेपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

२७ डिसेंबरपासून प्रिया शंभुनाथ सिंग (२५) ही कुडाघाट झरना टोला, गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रियाचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिस २५ फेब्रुवारी २०२५ रोजी वसईत आले आणि त्यांनी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे मदत मागितली. त्यानुसार अंबुरे यांनी गुन्हे शाखा कक्ष-३ ला तपासाचे आदेश दिले.

गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे प्रियाचा मागोवा घेतला असता, ती वारंवार वसईतील अमित सुग्रीव सिंग या तरुणाला भेटण्यासाठी येत असल्याचे आढळले. विशेषत: १६ डिसेंबर रोजी ती वसईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी अमितला चौकशीसाठी बोलावले, मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे दाखवल्यावर अखेर त्याने खून केल्याची कबुली दिली.

अमित आणि प्रियाच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता, तसेच प्रिया सतत लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे तिला वसईत बोलावून, फिरण्याच्या बहाण्याने पोमण, महाजन पाडा येथील रॉयल पार्क इंडस्ट्रीजजवळील मोकळ्या जागेत नेले. तेथे तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रियाचा मोबाईल राजधानी एक्सप्रेसमध्ये ठेऊन, ती दिल्लीला गेल्याचा बनाव केला.

दोन सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार; नांदेडसिटी पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अमितविरोधात कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांच्या टीमने तसेच यूपी पोलिस उपनिरीक्षक शिवांशु सिंग यांनी ही महत्त्वाची कामगिरी केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.

Web Title: Boyfriend from vasai kills girlfriend from up and throws body into drain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • #VasaiNews
  • crime news

संबंधित बातम्या

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?
1

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५…..; गुन्हेगारीचा आलेख उंचावला
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५…..; गुन्हेगारीचा आलेख उंचावला

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल
3

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा
4

Chhatarpati Sambhaji nagar Crime News दलित अत्याचारासह गुन्हेगारीचा वाढता आलेख; संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.