crime (फोटो सौजन्य: social media)
भोपाळमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मध्यधुंद अवस्थेत प्रियकराने त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. आणि हत्या केल्यानंतर मृतदेह घरात लपवून ठेवला. २ दिवस तो तिच्या मृतदेहाशेजारीच झोपत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव सचिन राजपूत असे आहे तर मृत प्रेयसीचे नाव रितिका सेन असे आहे.
गोंदिया हादरलं! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……
नेमकं काय घडलं?
भोपाळच्या बजरिया पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका लिव्ह-इन जोडप्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि मद्यधुंद अवस्थेत प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून हत्या केली. धक्कदायक बाब म्हणजे त्याने मृतदेह चादरीत गुंडाळला आणि घरात लपवून ठेवला. आणि दोन दिवस ती प्रेयसीच्या मृतदेहासोबतच घरात वावरत होता. मृतदेहाच्या शेजारीच झोपता होता. अखेर तीन दिवसांनी त्याने त्याच्या मित्राला आपल्या गंभीर गुन्ह्याबद्दल सांगितलं. ते ऐकून त्याचा मित्र हादरला. त्याने पोलिसांना फोन लावला आणि सगळं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. 28 ते 29 जूनच्या मध्यरात्री आरोपीने रितिकाची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन राजपूतने त्याच्या प्रियकराचा गळा दाबून हत्या केली. घटनेच्या वेळी सचिन नशेत होता. आरोपी सचिनने तब्बल ३ दिवसांनी त्याच्या मित्राला संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा हे ऐकून तो हादरला. त्याने सपाट्याने पोलिसांना फोन विकारात या घटनेची माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी सचिन राजपूतला अटक केली आहे.
हत्येनंतर आरोपी सचिनने रितिकाचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि तो तसाच खोलीत सोडून तो घटनास्थळावरून पळून गेला. नशा उतरल्यानंतर शुद्धीवर आला तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राला हे भयानक कृत्य सांगितले. सचिन आणि रितिका सुमारे साडेतीन वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघेही विदिशा जिल्ह्यातील सिरोज येथील रहिवासी आहेत. सचिन व रितीका सुमारे 10 महिन्यांपासून बजरिया परिसरात राहत होते. असे बजरिया पोलिस स्टेशनच्या प्रभारी शिल्पा कौरव यांनी सांगितले.
बांगलादेशात हिंदू महिलेवर अमानुष अत्याचार; दोन चिमुकल्या मुलीसमोर मारहाण आणि बलात्कार….