३५ हजार कर्ज फेडू न शकल्याने एका हिंदू महिलेला मारहाण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना बांगलादेशातून समोर आली आहे. या महिलेने आणि तिच्या भावाने या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिल्याने ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
जालना हादरलं! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाची अपहरण करून हत्या, मृतदेह बुलढाण्यात फेकला
नेमकं काय घडलं?
ही घटना गुरुवारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. हिंदू महिला तिच्या वडिलांच्या घरी दोन मुलींसह होती. त्यावेळी आरोपी फझर अली आला आणि दरवाजा दार ठोठावले. तो कुख्यात असल्याने हिंदू महिलेने दरवाजा उघडला नाही. तिने मी दरवाजा उघडणार नाही असं फझर अलीला सांगितलं. त्यांनतर अली फझरने दरवाजा तोडला आणि आतमध्ये घुसला. त्याने महिलेचे कपडे काढून तिला नग्न केले आणि मारहाण करायला सुरवात केली, तसेच तिच्यावर त्याने बलात्कारही केला. ३५ हजारांचं कर्ज तुझ्या कुटुंबाने घेतलं पण फेडलं नाही असं सांगत त्याने या महिलेला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फझर अली जेव्हा महिलेच्या घरात शिरला तेव्हा तिने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. परंतु कुणीही तिच्या मदतीसाठी आलं नाही. अत्याचार करत असतांना काही लोकांनी त्याचं शूटिंग त्याच्या मोबाईल मद्ये केला. गर्दी वाढल्याने फझरने तिथून पळ काढला. मात्र महिलेने तिच्यावर बलात्कार करून फझर पळाल्याचं लोकांना सांगितलं तेव्हा त्याच्या दिशेने लोकांनी आपला मोर्चा वळवला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ढाका या ठिकाणी फझरला अटक करण्यात आली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की पीडितेला बेदम मारहाण करण्यात आल्याचं दिसत होतं. तसंच तिच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या अशी माहिती बांगलादेशातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
भर रस्त्यावर कटरने परिचारिकेवर सपासप वार; संतप्त जमावापासून बचावासाठी आरोपी शिरला पोलीस ठाण्यात