Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल

फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित अलपवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. याच सततच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 01:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • फोटो व्हायरल करण्याची धमकी
  • वारंवार अत्याचार
  • अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
लातूर: लातूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित अलपवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. याच सततच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. पीडित अल्पवयीन मुलगी ही अनाथ होती. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…

नेमकं काय घडलं?

पीडित मुलगी अनाथ होती. लहानपणीच तिच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तिचे पालनपोषण व शिक्षण तिचे चुलते करत होते. काही काळापासून ती मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आरोपीचे नाव प्रथमेश शंकर अकोले असे आहे. तो फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. आरोपीने मुलीशी ओळख वाढवली. प्रेमाचे नाते असल्याचे भासवले, तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने विश्वास संपादन केला. फोटो काढण्याच्या निमित्ताने तो तिच्याशी अधिक जवळीक साधत गेला.

आरोपीने मुलीचे काही फोटो काढले आणि त्याचाच वापर करून तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्याने “फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन” अशी धमकी देत तिला सतत ब्लॅकमेल करत होता. या धमक्यांचा आधारे त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मृत मुलीच्या चुलत्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथहत्येस प्रवृत्त करणे, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग अशा गंभीर कलमान्वये तपास सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. पुढील तपास निलंगा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Sangli Crime: रेल्वे तिकिटाने उघड झाला हत्येचा कट, उसाच्या शेतात सापडला कुजलेला मृतदेह; पती-सासराच निघाले आरोपी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणी केला अत्याचार?

    Ans: फोटोग्राफरने केला अत्याचार

  • Que: कश्याचे दिले आमिष?

    Ans: प्रेमाचे नाते आणि लग्नाचे आमिष

  • Que: काय धमकी देण्यात आली?

    Ans: “फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन” अशी धमकी आरोपी देत होता.

Web Title: Latur crimethreat to make photo viral repeated torture by photographer 16 year old orphan mullene uchalla tokacha paul

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…
1

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…

Sangli Crime: रेल्वे तिकिटाने उघड झाला हत्येचा कट, उसाच्या शेतात सापडला कुजलेला मृतदेह; पती-सासराच निघाले आरोपी
2

Sangli Crime: रेल्वे तिकिटाने उघड झाला हत्येचा कट, उसाच्या शेतात सापडला कुजलेला मृतदेह; पती-सासराच निघाले आरोपी

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!
3

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत
4

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.