Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

गौरी पालवे या वरळी बीडीडी येथे राहत होत्या आणि केईएम रुग्णालयाच्या डेन्टिस विभागात कार्यरत होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 23, 2025 | 11:41 AM
Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
Follow Us
Follow Us:
  • अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह
  • लग्नाला स्वतः पंकजा मुंडेही उपस्थित होत्या
  • राहत्या घरी अनंत गर्जेंच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या
Mumbai Crime News: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळीत उघडकीस आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह यंदाच्या ७ फेब्रुवारी रोजी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी पालवे यांनी मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासानुसार कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. गौरी पालवे या वरळी बीडीडी येथे राहत होत्या आणि केईएम रुग्णालयाच्या डेन्टिस विभागात कार्यरत होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?

शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्री गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ काही महिन्यांपूर्वीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दोघांचा विवाह झाला होता. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जेंच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशीरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम तत्काळ रद्द केले असल्याची माहिती मिळाली आहे.

मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला असून त्यावर पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोस्टमार्टम अहवालातूनच आत्महत्येचे अचूक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, वरळी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. विवाहाला अवघे १० महिने होत असताना तरुण पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

BJP National President: वय, कामगिरी आणि रणनीती; धर्मेंद्र प्रधान होणार भाजपचे पुढचे अध्यक्ष?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह यंदाच्या ७ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नाला पंकजा मुंडे तसेच त्यांची बहीण प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. अवघ्या दहा महिन्यांच्या संसारानंतर गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली असून परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर नेमके काय घडले, गौरी यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. कुटुंबीयांनी केलेल्या प्राथमिक आरोपांनुसार, अनंत गर्जे यांचे ‘अफेअर’ असल्याने गौरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिच्या सासरच्या मंडळींकडून तिच्यावर छळ होत होता, असा आरोपही गौरीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, वरळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. कुटुंबीयांची चौकशी सुरू असून अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यातच तरुण डॉक्टरने आपले जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Breaking news big news bjp minister pankaja mundes pa wife commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai News
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?
1

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, लासूर स्टेशनमध्ये थरार; नेमकं काय घडलं?

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल
2

अण्णासाहेब पाटील महामंडळाची फसवणूक, तब्बल दहा लाखांना घातला गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?
3

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी
4

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.