
धक्कादायक ! भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; कारण काय तर...
दिंडोरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील चौसाळे गावात जुन्या भाडणांच्या कुरापती व सोडवासोडवीत झालेल्या भांडणात १८ वर्षीय तरुणाचा खून झाला असून, आणखी एक युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली.
राहुल किशोर काळे (वय १८, रा. एकलहरे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय पवार (वय १७) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. रात्री चौसाळे गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढत वाद सुरू केला. हे भांडण सोडवण्यासाठी विशाल पवार पुढे आला असता, मला का मारले असा जाब विचारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याच्यावर कटरने वार करण्यात आला. त्याच गटातील राहुल काळे याच्यावरही तीक्ष्ण हत्याराने छाती व पाठीवर वार करण्यात आले. त्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने राहुलचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : खाकी वर्दीवर काळी छाया! सुनेसोबत ‘अवैध संबंध’, माजी DGP वर मुलाला संपवल्याचा गंभीर आरोप; गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राहुल व जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यात मोहन लहू पवार, दीपक धनराज गायकवाड, योगेश बाळू गायकवाड, निवृत्ती पोपट चौधरी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
राहुलच्या आईची पोलिसांत फिर्याद
याप्रकरणी राहुल काळे याच्या आईच्या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये वाढ
वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धानोरीत महिलेचा खून करुन पसार झालेल्या बांधकाम मजुराला पोलिसांनी अटक केली आहे. एका गृहप्रकल्पाजवळ महिलेचा मृतदेह सापडला होता. विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला.