सुनेसोबत 'अवैध संबंध', माजी DGP वर मुलाला संपवल्याचा गंभीर आरोप (Photo Credit - X)
चंडीगड: पंजाबच्या राजकीय आणि पोलिस वर्तुळात एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. पंजाबचे माजी डीजीपी (DGP) मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी आणि माजी मंत्री रझिया सुल्ताना, मुलगी आणि सून यांच्यासह कुटुंबातील चार जणांविरुद्ध मुलाच्या हत्येचा आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा यांचा मुलगा अकील अख्तर याचा मृत्यू १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंचकुला येथील निवासस्थानी झाला होता. कुटुंबाने सुरुवातीला ‘औषधांचा ओव्हरडोज’ (Overdose) हे मृत्यूचे कारण सांगितले होते.
अकीलच्या मृत्यूनंतर, २७ ऑगस्ट रोजीचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये अकीलने कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. अकीलने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, कुटुंबातील लोक त्याच्या हत्येचा कट रचत आहेत. त्याने व्हिडिओमध्ये आपले वडील मोहम्मद मुस्तफा आणि पत्नी (स्वतःची सून) यांच्यात ‘अवैध संबंध’ असल्याचा थेट आरोप केला आहे.
पूर्व DGP मुस्तफा के बेटे के खुलासे , होश उड़ जाएँगे अकील की बाते सुन कर pic.twitter.com/qpuLezl9Lw — Gurpreet Garry Walia (@garrywalia_) October 18, 2025
त्याने असाही दावा केला होता की, त्याची आई (माजी मंत्री रझिया सुल्ताना) आणि बहीण निशात अख्तर यांच्यासह संपूर्ण कुटुंब त्याला जीवे मारण्याचा कट रचत आहे किंवा त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक; आरोपींकडून मुद्देमालही जप्त
अकीलने व्हिडिओमध्ये मानसिक छळ, जबरदस्तीने रिहॅब सेंटरमध्ये पाठवणे, व्यवसायापासून वंचित ठेवणे आणि शारीरिक छळ केल्याचेही आरोप केले होते. तसेच, त्याने आपल्या डायरीमध्ये सुसाइड नोट असल्याचेही म्हटले होते. शेजारी शमसुद्दीन यांनी पंचकुला पोलिस आयुक्तांना तक्रार सादर केल्यानंतर, पंचकुला पोलिसांनी तक्रार आणि व्हिडिओच्या आधारावर मनसा देवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ (१) आणि ६१ (हत्या आणि गुन्हेगारी कट) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. डीसीपी सृष्टि गुप्ता यांनी सांगितले की, “तक्रारीच्या आधारावर आम्ही आता हत्या आणि कटाच्या कलमांखाली एफआयआर दाखल केली आहे. मृतकाचे वडील, आई (माजी मंत्री), बहीण आणि पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.”
या प्रकरणाची संपूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी (विशेष तपास पथक) तातडीने स्थापन करण्यात आली आहे. डीसीपी सृष्टि गुप्ता यांनी सांगितले की, “या सर्वांना आम्ही आमच्या चौकशीत सामील केले आहे. व्हिसेरा नमुन्याचे विश्लेषण सुरू आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल.”
‘ठोकत नाही ओ, मी तोडतो’, तरुणाची इन्स्टाग्रामवर पोस्ट; आता पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा