Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: बुलंदशहर हादरलं! वडिलांनीच केली सातवीत शिकणाऱ्या लेकीची हत्या, ५०० रुपयांसाठी रचला कट

जन्मदात्या वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केल्याची समोर आले आहे. मृतक मुलीने वडिलांच्या पाकिटातून परवानगीशिवाय ५०० रुपये काढून घेतले म्हणून ही हत्या करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 29, 2025 | 10:56 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केल्याची समोर आले आहे. मृतक मुलीने वडिलांच्या पाकिटातून परवानगीशिवाय ५०० रुपये काढून घेतले म्हणून ही हत्या करण्यात आली. आरोपी वडिलाने गळा दाबून आपल्या निष्पाप लेकीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत मुलीचं नाव सोनम असे होते. तर आरोपी वडिलांचं नाव अजय शर्मा असे आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना उत्तर प्रदेश येथील बुलंदशहर येथील बिचौली येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम ही सातवीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान, शाळेचा गणवेश परिधान केलेल्या एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. बुलंदशहर पोलीस ठाणे परिसरातील एका पुलाखाली झुडपात मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि नांतर ओळख पटवण्यात आली.

कशी केली हत्या?

या प्रकरणाचा तपासादरम्यान, सोनम गुरुवारी शाळेत गेल्याच उघड झालं. तिचे वडील अजय शर्मा दुपारी तिला शाळेत घेण्यासाठी गेले. तेव्हा तिला घरी न नेता तिला शेतात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिचा स्कार्फने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कालव्याजवळ फेकून दिला. आरोपी वडिलांच्या महितीवरून पोलिसांनी मुलीच्या शाळेची बॅग शेतातून ताब्यात घेतली.

का केली हत्या?

पोलीस चौकशीत आरोपी वडिलाने सांगितले की मुलगी गेल्या काही दिवसांपासून घरून पैसे घेत होती. त्यामुळे तिच्या पालकांमध्ये वारंवार वाद होत होती. याच संतापाच्या भरात वडिलांनी गळादाबून हत्या केल्याचे स्पष्ट केले.

हत्येनंतर शाळेला खोटी माहिती

हत्येनंतर आरोपी वडिलांनी शाळेला खोटी माहिती दिली, त्यांची मुलगी नातेवाईकांना भेटायला गेली आहे आणि पुन्हा ती तीन ते चार दिवस भेटायला येणार नाही. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र

उत्तर प्रदेश येथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने आपलं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा फिल्मी षडयंत्र आखल्याचे समोर आले आहे. या तरुणीने आपल्या चेहऱ्यावर सॉस लावून रक्ताचे डाग असल्याचे भासवत धमकीचे फोटो आणि मेसेज पाठवले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. तिने हे सर्व केवळ ठरलेलं लग्न मोडावं या उद्देशाने केलं होत. परंतु पोलिसांनी जेव्हा या मुलीचा शोध घेता तेव्हा अनेक धक्कदायक बाब समोर आल्या आहेत.

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?

Web Title: Bulandshahr shaken father kills seventh grader plots to get rs 500

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime: चेहऱ्यावर सॉस, हातात मोबाईल आणि फिल्मी ड्रामा; लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र, पण…
1

Uttar Pradesh Crime: चेहऱ्यावर सॉस, हातात मोबाईल आणि फिल्मी ड्रामा; लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र, पण…

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?
2

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना
3

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या
4

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.