विरारमधील घरफोडीचा लावला छडा; 15 गुन्ह्यातील घरफोड्या गजाआड (संग्रहित फोटोे)
विरार पूर्व परिसरातील रहिवासी फिर्यादी दीपक देऊ कुंभार (वय ५८) यांचे घर १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी बंद होते. दुपारी २.३० ते २.४५ या केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाची तिजोरी उचकटून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २००००० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले
पोलिस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त संजय शिंत्रे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक समीर शेख, सहायक पोलिस निरीक्षक अमोल तळेकर, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वडणे, प्रकाश तुपलोंढे, श्रेणी उपनिरीक्षक रामचंद्र पाटील, अंमलदार व सायबर पोलिस ठाण्याचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने थेट छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून आरोपी आरिफ शेख याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विरारमधील घरफोडीची कबुली दिली असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.






