फोटो सौजन्य AI
सुदानच्या अबीई येथील बाजारपेठेजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १५० जणांचा मृत्यू झाला आहे . या हल्ल्यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली असून , निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .
आफ्रिकेतील सुदान आणि दक्षिण सुदान यांच्या सीमेवरील अबीई हा वादग्रस्त प्रदेश राहुल असून सध्या हा प्रदेश टोकाचा हिसांचार याच्या विखळ्यात सापडला आहे . सोमवार १९ ऑक्टोबर रोजी येथील अमिएट बाजारपेठेत ड्रोन हल्ला झाला . या हल्ल्यात किमान १५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रसाशनाने दिली आहे . हल्ल्यानंतर बाजारपेठेतील इंधन साठ्याला आग लागल्याने परिस्थिती अजूनच भीषण बनली . आगीमुळे अनेक जण गंभीररीत्या भाजले असून आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
या झालेल्या हल्ल्याला अबीई प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुदानच्या लष्कराला जबाबदार धरले आहे . दुसरीकडे सुदानच्या लष्कराशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंधन टँकरना लक्ष केल्याचे सांगितले . हे टँकर आरएसएफच्या ताब्यातील भागाकडे जात असल्याचा लष्कराचा संशय होता . मात्र या कारवाईत नागरिकांना लक्ष केले नसल्याचा लष्कराचा दावा आहे . बाजारपेठेतील नागरिकांच्या मृत्यूमुळे या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित आहेत .
Breaking News : संघर्ष चिघळला ;हुथींनी केलेल्या हल्ल्यात येमेनच्या ५३ सैनिकांचा जागीच मृत्यू
सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून सरकारी लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यात गृहयुद्ध सुरु आहे . सत्तासंघर्षातून सुरु झालेल्या या युद्धाने आता देशाच्या सीमावर्ती भागांनाही आपल्या विखळ्यात घेतले आहे . खार्तूमकडूनआरएसएफचे सैनिक दक्षिण सुदानजवळील वादग्रस्त भागात लपून बसल्याचा आरोप केला जात आहे .
या हल्ल्यामध्ये दक्षिण सुदानमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . दक्षिण सुदानने सुदानच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला आहे . संयुक्त राष्ट्रांनाही या हल्ल्याचा निषेध करत नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे . मदतकार्य करणाऱ्या डॉक्टरकडून जखमींवर उपचार सुरु आहेत .






