Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hotel Rating Fraud: ‘हॉटेल रेटिंग’च्या जाळ्यात व्यावसायिक युवती अडकली; एका क्लिकवर दीड लाख रुपये साफ!

छत्रपती संभाजीनगर येथे 'हॉटेल रेटिंग'च्या ऑनलाईन आमिषाने व्यावसायिक युवतीची फसवणूक. एका क्लिकवर १ लाख ६५ हजार रुपये सायबर चोरांनी केले साफ. टेलिग्राम ॲपद्वारे झालेल्या या फसवणुकीच्या गुन्ह्यात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 01, 2025 | 06:51 PM
'हॉटेल रेटिंग'च्या आमिषाने व्यावसायिक युवतीला दीड लाखांचा गंडा (Photo Credit - AI)

'हॉटेल रेटिंग'च्या आमिषाने व्यावसायिक युवतीला दीड लाखांचा गंडा (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘हॉटेल रेटिंग’च्या जाळ्यात व्यावसायिक युवती अडकली
  • एका क्लिकवर दीड लाख रुपये साफ!

छत्रपती संभाजीनगर: हॉटेल्सना ऑनलाईन रेटिंग (Online Rating) दिल्यास घरबसल्या हजारो रुपये कमवता येतील, अशा आमिषाला बळी पडून शहरातील एका व्यावसायिक युवतीने तब्बल एक लाख ६५ हजार रुपये गमावले. ही फसवणुकीची घटना २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान जटवाडा रोडवरील एकतानगरात घडली.

इन्स्टाग्राम लिंकवर क्लिक, फसवणुकीची सुरुवात

या प्रकरणी रुपाली सखाराम आढावे (वय २५, रा. एकतानगर, हर्सूल) यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपाली आढावे सुतगिरणी चौक येथे ‘आर.एस. मॉकटेल हाऊस’ नावाचे दुकान चालवतात. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी त्या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रील्स (Reels) पाहत असताना, त्यांना एक लिंक दिसली. या लिंकवर हॉटेल्सना रेटिंग दिल्यास घरबसल्या हजारो रुपये मिळतील, असा मजकूर होता. उत्सुकतेपोटी त्यांनी ती लिंक उघडताच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून चॅटिंग सुरू झाले. समोरील व्यक्तीने स्वतःला एचआर असिस्टंट असल्याचे सांगत दररोज पाच ते आठ हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अंजापार चेट्टीनंद नावाच्या हॉटेलला रेटिंग दिले आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवला.

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

टेलिग्राम टास्क आणि पैशांचा मोह

पुढील टप्प्यात त्यांना धरानी गोखले नावाच्या टेलिग्राम ग्रुपकडे वळवण्यात आले. तिथे नाव, वय, बँक खात्याची माहिती मागवण्यात आली. माहिती दिल्यानंतर त्यांच्या पेटीएम खात्यात १८० रुपये जमा झाले. एवढी रक्कम मिळाल्याने रुपाली आढावे यांचा विश्वास बसला. दुसऱ्या दिवशी मनिष रेड्डी नावाच्या टेलिग्राम अकाऊंटवरून नवा ‘टास्क’ पाठवण्यात आला. यात आठ टास्कपैकी पाच मोफत होते, मात्र उर्वरित तीन टास्क पूर्ण करण्यासाठी अकरा हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.

दीड लाख रुपये साफ, तरी मिळाले नाही पैसे

फिर्यादींनी फोन-पेच्या माध्यमातून दिलेल्या युपीआय आयडीवर ही रक्कम भरली. त्यानंतर त्यांना अनिशा टप्पा नावाच्या दुसऱ्या टेलिग्राम अकाऊंटवर संपर्क करण्यास सांगण्यात आले. रुपाली आढावे यांनी वेगवेगळ्या युपीआय आयडीवर टप्याटप्याने एकूण १ लाख ६५ हजार रुपये पाठवले. इतके पैसे भरूनही त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. उलट, आरोपींनी त्यांना ‘अजून २ लाख २९ हजार रुपये भरल्यास एकूण पैसे मिळतील’ असे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रुपाली आढावे यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी फसवणूक करणारे टेलिग्रामधारक धरानी गोखले, अनिशा टप्पा यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati Crime: २ तस्कर जेरबंद, १०४ किलो गांजा जप्त; ओडिशाच्या गांजातस्करीचा पर्दाफाश

Web Title: Businesswoman falls into hotel rating trap loses rs 15 lakh in one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Fraud Case
  • online fraud

संबंधित बातम्या

Vaijapur: साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय! वैजापूर बसस्थानकातील घटनेने दिला संदेश
1

Vaijapur: साडेतीन लाखांच्या लालसेवर माणुसकीचा विजय! वैजापूर बसस्थानकातील घटनेने दिला संदेश

Chhatrapati Sambhajinagar Murder: संभाजीनगर पुन्हा हादरले! तरुणाचा तलवारीने खून, पोरं बोलवली अन् ३० सेकंदांत…
2

Chhatrapati Sambhajinagar Murder: संभाजीनगर पुन्हा हादरले! तरुणाचा तलवारीने खून, पोरं बोलवली अन् ३० सेकंदांत…

TET Exam 2025: ‘टीईटी’साठी विक्रमी प्रतिसाद! यंदा ४ लाख ७५ हजार विद्यार्थी, परीक्षार्थींच्या संख्येत दीड लाखांनी वाढ
3

TET Exam 2025: ‘टीईटी’साठी विक्रमी प्रतिसाद! यंदा ४ लाख ७५ हजार विद्यार्थी, परीक्षार्थींच्या संख्येत दीड लाखांनी वाढ

Chhatrapati Sambhajinagar: जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब; अवकाळी पावसामुळे पाणीसाठा ९७ टक्क्यांवर!
4

Chhatrapati Sambhajinagar: जायकवाडीसह मराठवाड्यातील प्रमुख धरणे १००% तुडुंब; अवकाळी पावसामुळे पाणीसाठा ९७ टक्क्यांवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.