पुण्यात रिक्षाचालकाची हत्या (फोटो- istockphoto)
पुण्यातील कोंढव्यात रंगला थरार
रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या
आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध पेटले
Crime News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. गॅंगवॉरच्या युद्धातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कोंढवा भागात रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.
कोंढवा भागात एका रिक्षा चालकाची हत्या झाली आहे. हा रिक्षाचालक कोमकर टोळीतील सदस्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. ही हत्या टोळीयुद्धातून झाल्याचे म्हटले जात आहे. पुण्यातील कोंढवा भागात दिवसाढवळ्या हत्या झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या
दोन टोळ्यांच्या संघर्षातून आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर पसार झालेल्या बंडू आंदेकर टोळीतील सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. दत्ता बाळू काळे (वय २४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने केली आहे.
बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले
एक वर्षांपुर्वी (दि. १ सप्टेंबर २०२४) रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा टोळी युद्धातून सोमनाथ गायकवाड व त्याच्या टोळीने खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून केला होता. त्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई केली होती. या टोळीतील काही जण अद्यापही पसार आहेत. दरम्यान, सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराइत दत्ता काळेने पाळत ठेवली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडले. वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती.






