Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल सव्वा कोटींचा घातला गंडा

आमिषे दाखवून सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2024 | 01:03 PM
आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल सव्वा कोटींचा घातला गंडा

आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल सव्वा कोटींचा घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पोलीस, सीबीआय कारवाईची भीती दाखविणे, तसेच घरातून कामाची संधी अशा प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कोथरुड भागातील एका महिलेची घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून चोरट्यांनी चार लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी परतावा दिला. परतावा मिळाल्यानंतर आणखी रक्कम गुंतविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

वाघोली भागातील एका तरुणाला अटक करण्याची भीती दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून ४१ लाख ४० हजार रुपये उकळले. एका प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्वरीत पैसे दिल्यास कारवाईला सामाेरे जावे लागेल, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाघोली (लोणीकंद) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परदेशी चलन व्यवहारात (फाॅरेक्स ट्रेडिंग) गुंतवणुकीच्या आमिषाने वाघोलीतील एका तरुणाची ३३ लाख ७८ हजार ३२० रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हे सुद्धा वाचा : पुण्यात चाललंय काय? व्हाट्सअ‍ॅपवर डीपी ठेवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार

वर्षभरानंतर गुन्हा दाखल

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने हडपसर परिसरातील एकाची सायबर चोरट्यांनी ४९ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २१ डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला होता. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तक्रारदाराला पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला त्याला परतावा दिला. त्यानंतर तक्रारदाराने आणखी रक्कम चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केली. पैसे जमा केल्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

पुण्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले

पुण्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तन्मय रमेश जाधव (रा. ओैंदुबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत तन्मय जाधवशी ओळख झाली होती.

तक्रारदाराला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. जाधवने व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस या खासगी वित्तीय संस्थेतून १५ दिवसात चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर तक्रारदारांना त्याने रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे त्यांच्याबरोबर मुद्रांकावर करारनामा केला. कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख ८७ हजार रुपये जाधवने घेतले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. याबाबत व्यावसायिकाने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जे. आर. फडतरे तपास करत आहेत.

Web Title: By showing bait cyber thieves have cheated the citizens of pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
1

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
2

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !
3

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव
4

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.