लक्ष्मण हाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
मराठा समाजाविरुद्ध केले होते वादग्रस्त विधान
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापणार
laxman Hake: राज्यात सध्या आरक्षणचा मुद्दा तापला आहे. आरक्षण विषयावर राजकरण सुरू झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. मात्र या जीआरल ओबीसी समाजाने विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके या जीआरविरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र आता हके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, ते जाणून घेऊयात.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. तसेच हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला आहे. मात्र यावरून आता राजकारण तापले आहे. बीडमधील गेवराई येथे लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबबत वादग्रस्त विधान केले असल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्याविरुद्ध परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्याबद्दल लक्ष्मण हाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांच्याविरुद्ध अदखालपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल हके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लक्ष्मण हाके यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्य सरकारने जो आरक्षणचा जीआर काढला आहे, त्याला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
राज्यात आरक्षणाचा वाद पेटणार?
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील ओबीसी संघटनांची तातडीची बैठक घेतली.