Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime News: ठाण्यात दोन जणांवर जीवघेणा हल्ला; शिंदे गटाच्या उपशहरप्रमुखासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा

आरोपींपैकी स्वप्निल शेडगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उपशहरप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2025 | 03:55 PM
Thane Crime News: ठाण्यात दोन जणांवर जीवघेणा हल्ला; शिंदे गटाच्या उपशहरप्रमुखासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा
Follow Us
Close
Follow Us:
  • ठाण्यात मध्यरात्री दोन जणांवर लाठी-काठीने जीवघेणा हल्ला
  • शिंदे गटाच्या उपशहरप्रमुखासह ९-१० जणांवर गुन्हा दाखल
  • जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

Thane Crime News: ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदिरानगर परिसरात 26 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन जणांवर लाठी-काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 9 ते 10 जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपींपैकी स्वप्निल शेडगे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उपशहरप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती! मुस्लीम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना, पोलिसांकडून लाठीचार्ज

काय आहे प्रकरण?

फिर्यादी मलया जगबंधु बारीक (38, रा. अंबिकानगर, वागळे स्टेट) हे हॉटेल व्यवसाय करतात.गेल्या वर्षी 2024 मध्ये त्यांचा वर्तकनगर येथे राहणाऱ्या काही जणांसोबत वाद झाला होता. याच वादाचा राग धरून 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मेहुणे मोटारसायकलवरून जात असताना इंदिरानगर येथे टोळक्यांनी त्यांची गाडी अडवून हल्ला केला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

“गणेश लांडगेने फिर्यादी मलया व त्यांच्या मेहुण्यांवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यांना जबर मारहाणही केली. गणेश लांडगेसोबत असलेल्या आणखी ४ ते ५ जणांनीही त्या दोघांवर लाठी-काठीने हल्ला करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत मलया यांना डोके व तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक! भारतातील १०० हून अधिक महिलांची फसवणूक, ‘या’ अ‍ॅपमुळे बँकेचे अकाऊंट साफ

मलया जगबंधु बारीक यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून गणेश लांडगे, अमर तुशंभर, ओंकार भोसले, अभि पाटील, स्वप्नील शेडगे तसेच इतर ४ ते ५ अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

“दरम्यान, आरोपी स्वप्नील शेडगे हे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख असून, शहरात बॅनरबाजीच्या कामांमध्ये सक्रिय आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी त्याच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला अटक करण्यात आली होती. तसेच, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला तडीपारही करण्यात आले होते.”

 

Web Title: Case filed against 9 to 10 people including shinde group deputy mayor in fatal attack on two people in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Police
  • Thane Crime News

संबंधित बातम्या

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
1

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर
2

कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर

राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले
3

राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
4

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.