
वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ
गुरुवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मुरारी पार्क परिसरातील दुकानांना लक्ष्य केले. येथील श्री नारायणगिरी ऑरगॅनिक अॅग्रो, किसान अॅग्रो एजन्सी व खांबेकर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांचे शटर उचकावून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच परिसरातील सीएसएम टेक सोल्युशन या मोबाईल दुकानाचे शटर उचकावून लॉक तोडण्यात आले. त्यानंतर दुकानातील गल्ल्यात ठेवलेली सहा ते सात हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली.
मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फसला
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोदावरी कॉलनी व आदर्श कॉलनी परिसरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. परिसरात झाडलोट करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोने दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिक सतर्क झाल्याने संबंधित व्यक्तीचा प्रयत्न फसला.
न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू
सर्व तक्रारी न आल्याने चोरीचा आकडा अस्पष्ट
या सर्व घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने संबंधित चोरट्याचा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुरारी पार्क परिसरातील चोरीप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, शहरातील अन्य ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती असूनही संबंधितांनी अद्याप तक्रारी दिलेल्या नाहीत. त्यामुळे चोरीच्या घटनांचा नेमका आकडा व नुकसानीची व्याप्ती स्पष्ट होऊ शकलेली नाही.
चोरट्यांनी किराणा दुकानाकडे वळवला मोर्चा
चोरट्यांनी लाडगाव रोडवरील महेश किराणा दुकानाकडे मोर्चा वळवला. दुकानाचे लॉक तोडून शटर उचकावण्यात आले व आतील दहा हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहरातील विविध भागांत चोरीचे प्रयत्न व प्रत्यक्ष चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
FAQ
वैजापूरात नेमके काय घडले? कुठे चोरी झाली?
– छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात एकाच रात्रीत 4 दुकाने फोडल्याची घटना घडली. मध्यरात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. गस्त नसल्याचा फायदा घेतला.
चोरीचा प्रकार कसा आहे? टोळी आहे का?
– छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस सांगतात, ही Inter-District टोळी असू शकते. यापूर्वी कोपरगाव, संगमनेर, घोटी, वैजापूर येथे अशाच चोऱ्या करणाऱ्या टोळीला पकडले होते.
व्यापाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
– CCTV – Night Vision + Cloud Backup बसवावे. फक्त Dummy नको. वैजापूरातील 60% दुकानांचे CCTV बंद असतात, अशीही माहिती समोर आली आहे.