Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

अहिल्यानगर येथील पाइपलाइन रोडवरील भगवान बाबा चौक परिसरात एका इमारतीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर युवकाने गोळीबार केल्याची घटना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात महिला जखमी झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2026 | 02:47 PM
आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • गोळीबारच्या घटनेनं अहिल्यानगर हादरलं
  • इमारतीमध्ये  ३५ वर्षीय महिलेवर गोळीबार
  • गोळीबार करुन युवकानेही संपवलं जीवन
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पाइपलाइन रोडवरील भगवान बाबा चौक परिसरात एका इमारतीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर युवकाने गोळीबार केल्याची घटना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात महिला जखमी झाली आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या युवकाने तेथून पळ काढल्यावर त्याने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. योगेश डोंगरे (पूर्ण नाव पत्ता नाही) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

 

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास युवक त्याच्या ओळखीच्या महिलेसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये होते. तेथे दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून युवकाने महिलेवर बंदुकीतून गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक दिलीप टिपरसे, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. युवकाने तेथून पळ काढल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान काही वेळाने या युवकाने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारातील जखमी महिलेची प्रकृती स्थिर असून युवकाने आत्महत्या केल्याचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. युवक व महिला यांच्यात कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर थरार! व्हिडिओच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार

एकतर्फी प्रेमातून घडली घटना

गोळीबाराची ही घटना नेमकी कशामुळे घडली, हे जरी समोर आले नसले तरी ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रहिवासी भागात झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.

हे सुद्धा वाचा : न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार

शाळेच्या सहलीमध्ये विद्यार्थिनींचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान एका अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातील विद्यार्थीनीवर चाकू हल्ला करण्यात झाले आहे. पाच दिवसांपूर्वी झालेल्या या वादातून व्हिडिओ डिलीट करावा लागल्याने आलेल्या रागातून विद्यार्थ्याने शुक्रवारी (दि. २३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावरच विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून बाणेर येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अहिल्यानगर येथे गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: अहिल्यानगर येथील पाइपलाइन रोडवरील भगवान बाबा चौक परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गोळीबाराची घटना घडली.

  • Que: गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव काय होते?

    Ans: गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव योगेश डोंगरे असे होते. त्याने कापूरवाडी परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

  • Que: गोळीबारात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती कशी होती?

    Ans: गोळीबारात जखमी झालेल्या ३५ वर्षीय महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती स्थिर असल्याचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी सांगितले.

Web Title: In ahilyanagar a young man shot a woman and then died by suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • crime news
  • firing
  • suicide news

संबंधित बातम्या

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ
1

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ

शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर थरार! व्हिडिओच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार
2

शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वारावर थरार! व्हिडिओच्या वादातून विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू
3

न्यायालयीन कामासाठी घराबाहेर पडल्या, पण वाटेतच काळाने गाठले; कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी
4

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.