
हातखंबा घाटामध्ये सिमेंटचा टँकर उलटला
रत्नागिरी जिल्ह्यात घडला मोठा अपघात
हायवेवरील वाहतूक झाली विस्कळीत
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हातखांबा घाटात आज एक भीषण अपघात घडला. कर्नाटकवरून सिमेंट घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येणारा एक भलामोठा टैंकर घाटातील वळणावर ताबा सुटल्याने कलंडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सदर टैंकर कर्नाटक राज्यातून सिमेंटचा साठा घेऊन रत्नागिरीकडे येत होता.
हातखांबा घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. टैंकर कलंडल्याने रस्त्याचा काही भाग व्यापला गेल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
Crime News: चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याची बोरमाळ लंपास; दार तोडून थेट…
टँकर मोठा असल्याने तो बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली आहे. सुदैवाने, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दोन दुचाकींचा अपघात
खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ वाशिष्टी डेरी परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा २९ जानेवारी २०२६ रोजी दु. ११.२५ च्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी क्र. एमएच ०८ एन ६२४६ ही दुचाकी मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातात दुचाकीस्वार राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (वय ४०, रा. खेड) रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघात मदतीसाठी कार्यरत असलेली जगदुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी वेळेत मदत केल्याने जखमी रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकले.
65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू
पुण्यातून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉल्कसाठी बाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला भरधाव कारणे धडक दिल्याचे समोर आले आहे. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पहाटे 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान झाला. अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आशा पाटील (वय 65) असे होते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.