
ओरोस येथे १० वर्षे सुरू होता खटला
2016 मध्ये झालेले पारंपरिक मच्छीमार आंदोलन
93 आरोपींची झाली निर्दोष मुक्तता
मालवण: तालुक्यात आचरा येथे २०१६ मध्ये झालेल्या पारंपरिक मच्छीमार आंदोलन प्रकरणी रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, सन्मेष परब, आकांक्षा कांदळगावकर यांच्यासह सह ९३ आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. (Crime News) आरोपींच्या वतीने अॅड. उल्हास कुलकर्णी, मालवण यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. याबाबत रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे.
श्रमिक मच्छिमार संघ, आचरा बंदर मच्छीमार संघटना व जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार यांनी आचरा बंदर येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी विषयात ३० ऑक्टोबर २०१५ रोजी यांनी मत्स्य विभाग विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर दोन्ही गटांना मध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये पारंपारिक मच्छीमार यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी मारहाण, दरोडा, शासकीय कामात अडथळा (भा.द.वि.क.३०७/३९५/३२६/३२५/३५३ /३३२/३३३/४५२/४३ ६/३३७/४२७/१४३/१४७/१४८/१४९/५ ०४/५०६) वगैरे गुन्हे दाखल झाले होते. या संघर्षांची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन, मासेमारी कायद्यामध्ये मोठे बदल केले होते.
ओरोस येथे १० वर्षे सुरू होता खटला
या प्रकरणात महिलांवर पण गुन्हे दाखल झाले होते. पारंपारिक मच्छीमार यांचे नेतृत्व करणान्या रविकिरण तोरसकर, छोटु सावजी, बाबी जोगी, दिलीप धारे नारायण कुबल, धर्माजी आडकर, आकांक्षा कांदळगावकर, अन्वय प्रभू, रश्मिन्न रोगे, सन्मेष परब सह ९३ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार यांनी मालवण येथे जेलभरोचा इशार देत व्यापक आंदोलन केले होते, सन २०१६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याकामी जिल्हा सत्र न्यायालय, ओरोस येथे (नियमित खटला क्रमांक ४३/२०१६) गेली दहा वर्षे खटला चालू होता. अॅड. उल्हास कुलकर्णी, मालवण यांनी आरोपींच्या वतीने भक्कम बाजू मांडली. त्यांना अॅड. प्राची कुलकर्णी व अॅड. अमेय कुलकार्ग मदतनीस म्हणून काम बधितले. जिल्हा न्यायालय या मुक्ततेनंतर मच्छीमार यांन योग्य न्याय मिळाला असे मत अॅड. उल्हास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा: Social Media Rumors Alert: उरणमध्ये ‘मुले पळवणारी टोळी’ ची अफवा? पोलिस तपासात झाले उघड
गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये भीती!
वसई किनाऱ्यापासून ६६ नॉटिकल अंतरावर खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. परंतु, ११ जानेवारी रोजी एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या. परंतु, घटनेस सात दिवसांचा अवधी गेला तरीही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला आहे. याचा मागमुस कुठल्याच यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समुद्राच्या त्या गूढ वर्तुळाचे अजूनही समोर आले नाही.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.