Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

पीक पाहणीच्या कामावरून सुरू झालेला वाद थेट तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाणीपर्यंत पोहोचला. चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथे घडलेल्या या प्रकारानंतर तलाठी संघ आक्रमक झाला असून, दोषीला अटक न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 30, 2026 | 03:13 PM
Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Follow Us
Follow Us:
  • पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला शिवीगाळ आणि मारहाण
  • झरी बु. येथे घटना; शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
  • तलाठी संघ आक्रमक; दोषीला अटक न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा
 

लातूर : पीक पाहणी का केली नाही, अशी विचारणा करत ग्राम महसूल अधिकाऱ्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील  चाकूर तालुका झरी (बु.) येथे मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी तलाठी मुकिंद पांडुरंग सुडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून एका व्यक्तीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘पीक पाहणी का केली नाही?’ असा जाब

मिळालेल्या माहितीनुसार, पीक पाहणीच्या कारणावरून तलाठी मुकिंद सुडके यांच्याशी संबंधित व्यक्तीने वाद घातला. पीक पाहणी का केली नाही, अशी विचारणा करत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.

हेही वाचा: प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

तलाठी संघ आक्रमक

या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने निषेध नोंदविला आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना तलाठ्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे संघ आक्रमक झाला असून, संबंधित दोषी व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

अटक न झाल्यास काम बंदचा इशारा

दोषीला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत तलाठी संघाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे महसूल विभागातील कामकाजावर आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा:Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

पीक पाहणीच्या कामावरून यापूर्वीही प्रश्न

पीक पाहणी ही महसूल विभागातील महत्त्वाची प्रक्रिया असून, खरीप आणि रब्बी हंगामात तिची नोंद केली जाते. महसूल नियमांनुसार पिके शेतात उभी असताना प्रत्यक्ष पाहणी करून नोंदी करणे अपेक्षित असते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Chakur talathi assault crop survey zari government work obstruction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Latur news
  • Maharashta Breaking News

संबंधित बातम्या

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
1

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

Massive Fire Shop in Latur : लातूरच्या लोखंड बाजारात भीषण आग; स्फोटात चार ते सहा दुकाने भस्मसात
2

Massive Fire Shop in Latur : लातूरच्या लोखंड बाजारात भीषण आग; स्फोटात चार ते सहा दुकाने भस्मसात

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद
3

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद

Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड
4

Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.