Fake TTE Caught in Falaknuma Express ( फलकनुमा एक्सप्रेसमध्ये बनावट टीटीई पकडला )
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ती महिला स्लीपर कोचमध्ये फिरताना आणि प्रवाशांची तिकिटे तपासताना दिसते. ती काही प्रवाशांकडून १,३०० ते १,४०० रुपयांपर्यंत दंड आकारतेय. असा आरोप आहे की, तिने ओडिशाच्या प्रवासासाठी अतिरिक्त ७५० रुपयांची मागणी देखील केली. त्या महिलेने गळ्यात एक लाल रंगाचे ओळखपत्र घातले होते, ज्यावर ‘QIONGXI ID CARD’ चिनी अक्षरात छापलेले होते. हे रेल्वेचे अधिकृत ओळखपत्र नाही.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by HITIK ROSAN DAS (@hitik_rosan_das_official)
प्रवाश्यांना या महिलेवर संशय आला आणि त्यांनी तिला तिचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. तिने सुरुवातीला नकार दिला आणि वाद घालू लागली. जेव्हा कार्ड दाखवण्यात आले, तेव्हा त्यावर चिनी भाषा स्पष्टपणे दिसत होती. डब्यात एकच गोंधळ उडाला. जवळचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जमा झाले. व्हिडिओमध्ये, ती महिला तिच्या फोनकडे बघत वाद घालताना दिसते.
हा संपूर्ण व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यात कार्ड आणि वाद दोन्ही स्पष्टपणे दिसत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि शेअर केला. चिनी कार्ड वापरून कोणी बनावट टीटीई म्हणून कसे वावरू शकते, यावर सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप
सोशल मिडिया युजर्सने लिहिले आहे की, “आता बनावट टीटीई सुद्धा आयात केले जातात!” काहींनी रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, आरपीएफ आणि खरे कर्मचारी उपस्थित असूनही अशी घटना कशी घडली, असा प्रश्न विचारला. अनेक प्रवाशांनी सांगितले की त्यांना बनावट टीटीईंच्या प्रकरणांमुळे अनेकदा त्रास होतो, पण इतकी उघड आणि विचित्र फसवणूक त्यांनी पहिल्यांदाच पाहिली. काहींनी सुचवले की प्रवाशांनी नेहमी खऱ्या टीटीईंचा गणवेश आणि अधिकृत ओळखपत्र तपासावे.
Ans: एका महिलेने स्वतःला टीटीई सांगून प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला.
Ans: लाल रंगाच्या ओळखपत्रावर 'QIONGXI ID CARD' असा मजकूर चिनी अक्षरांसह दिसत होता.
Ans: महिलेचे ओळखपत्र अधिकृत रेल्वे ओळखपत्रासारखे नसल्याने प्रवाशांना तिच्यावर संशय आला.






