
crime (फोटो सौजन्य: social media)
ओळख पटवणे मोठे आव्हान
पाटेगावच्या सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरी नदीच्या दुर्गम पात्रात हा मृतदेह पडून होता. अनेक दिवसांपासून पाण्यात किंवा नदीकाठी असल्याने तो अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पैठण पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय दवाखान्यात पाठवला आहे. आदळून आलेला मुरतदेह पूर्णपणे कुजलेला अवस्थेत सापडल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
पोलिसांचे आवाहन
मृत व्यक्तीने कोणते कपडे घातले होते किंवा त्याच्याकडे काही ओळख पटतील अशा वस्तू होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत. आजूबाजूच्या गावांमधून किंवा जिल्ह्यातून कोणी व्यक्ती बेपत्ता आहे का याची माहिती पोलीस रेकॉर्डवरून तपासली जात आहे. या घटनेने गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, जर कोणाकडे या मृत व्यक्तीबद्दल माहिती असेल किंवा कोणाची नातेवाईक व्यक्ती बेपत्ता असेल, तर त्यांनी तात्काळ पैठण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात, पाटेगाव शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर.
Ans: अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
Ans: मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून ओळख पटवण्यासाठी बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत.