Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘खतरों के खिलाड़ी’ शोच्या नावाखाली 50 लाखांचा व्यवहार; पार्टीला बोलावून प्राध्यापकाची हत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 लाखांच्या आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ‘खतरों के खिलाड़ी’सारखा शो तयार करण्याच्या बहाण्याने घेतले होते पैसे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 08:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 50 लाखांच्या आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून.
  • ‘खतरों के खिलाड़ी’सारखा शो तयार करण्याच्या बहाण्याने आरोपींचा कट.
  • पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे यांना अटक.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एखाद्या चित्रपटासारखा बनाव रचण्यात आला. मात्र पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत प्राध्यापकांचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे आहे. ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. तर आरोपींचे नाव विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे असे आहे. प्राध्यापक आणि आरोपींमध्ये 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता.‘खतरों के खिलाड़ी’(Khatro ke Khiladi) सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र पैसे घेतल्यानंतर अनेक दिवस उलटूनही कोणताही शो तयार न झाल्याने प्राध्यापकांनी वारंवार पैश्यांची मागणी केली.

पार्टीसाठी बोलावले आणि…

या सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यांनतर परत येतांना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर शहरातील एका रुग्णालयाजवळ येईपर्यंत त्यांचा मोबाईल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक

त्यांनतर आरोपींनी मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी शहरालगत असलेल्या गेवराई तांड्याजवळ गुप्तधन असल्याची माहिती एका जेसीबी चालकाला दिली. त्याच्याकडून दोन खड्डे खणून घेतले. या खड्ड्यांमध्ये पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह पुरण्यात आला. हत्याकेल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच प्राध्यापकांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही देण्यात आली.

याप्रकरणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल त्यांच्या कुटुंबाने केली होती. पोलिसांना तपासादरम्यान विशाल राठोड आणि आकाश पवार यांच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनतर दोघांनी स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबामध्ये विरोधाभास आढळून आला. यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला. यांनतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी सुरु केली. तेव्हा हत्येचा संपूर्ण प्रकरण समोर आला.

पोलीस तपास सुरु

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होते. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. . या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे. आरोपींनी त्या पैश्यांचा काय केलं? याचा देखील पोलीस तपास करत आहे.

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत लाखोंची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडली.

  • Que: मृत प्राध्यापक कोण होते?

    Ans: मृत प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे हे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: 50 लाखांच्या आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime 50 lakh transaction under the guise of the show khatron ke khiladi professor murdered after being invited to a party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.