Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: रस्त्यावरून उचललं, निर्जन शेतात नेऊन गुप्तांगावर वार, तरुण जीवाशी देतोय झुंज

छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 वर्षीय तरुणावर अज्ञातांनी शेतात नेऊन धारदार शस्त्राने क्रूर हल्ला केला. गुप्तांगावर वार करत गंभीर जखमी केले. जखमीवर उपचार सुरू असून आरोपी फरार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 10:20 AM
जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

Follow Us
Follow Us:
  • अज्ञातांनी तरुणाला जबरदस्तीने शेतात नेऊन हल्ला
  • धारदार शस्त्राने गुप्तांगावर वार; प्रकृती गंभीर
  • पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू, परिसरात भीती
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूर–लासूर मार्गावरील शिंदेवाडी फाटा परिसरात 32 वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्या गुप्तांगावर वार केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

सीताराम आसाराम आळंजकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्यासुमारास शिंदेवाडी फाट्याजवळील एका शाळेजवळ सीताराम उभे असतांना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने पकडले. त्यांनतर रस्त्यालगतच्या एका निर्जन शेतात नेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या गुप्तांगावर वार करत गंभीर जखमा केल्या. या प्रकरणानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतच सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून सोडले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

धक्कादायक! “हत्येसाठी कोणते शस्त्र चांगले, हातोडा की चाकू?” 18 वर्षीय मुलाने AI ला विचारले अन् मग…

या घटनेनंतर सीताराम बराच वेळ घटनास्थळी विव्हळत पडून होते. त्यांच्या अवस्थेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीताराम यांना तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

पोलीस तपास सुरु

हल्ला कोणी केला, हल्लयमधील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या क्रूर हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur Crime: शेवटचा व्हिडिओ कॉल…आणि आत्महत्या! नागपुरात नर्सिंग विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर–लासूर मार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ.

  • Que: हल्ला कसा करण्यात आला?

    Ans: तरुणाला शेतात नेऊन धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

  • Que: सध्या पोलिसांची काय कारवाई सुरू आहे?

    Ans: सध्या पोलिसांची काय कारवाई सुरू आहे?

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime abducted from the street taken to a secluded field and attacked in the private partsyoung man battling for his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.