crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हत्या झाल्याचे समोर आले आहे. शहरातील एसएफएस शाळेच्या मैदानावर तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेला ३० वर्षीय सुरेश भगवान उंबरकर हा आम्लेटच्या दुकानावर काम करत होता. ही घटना जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मैदानावर घडली आहे. मात्र सुरेशची हत्या कोणी केली आणि का केली? याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताय? तर थांबवा; ‘इथं’ पोलिसांनी केली धडक कारवाई
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या निर्जन मैदानावर काल (मंगळवारी) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही माहिती कळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हा कुक होता. घटनास्थळी रात्री कायम अंधार असतो. त्यामुळे हे मैदान रात्रभर मद्यपी आणि नाश करणाऱ्यांचा अड्डा बनलेले आहे.
मंगळवारी रात्री मैदानावर अंधारात काहीतरी विचित्र घडत असल्याचे दुसऱ्या मद्यपींनी पाहिले. त्यावेळी ते तिकडे गेले असता काही जणांनी एका तरुणाचा गळा चिरला आणि ते पळून जात असल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी जव्हारनगर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे भयंकर दृश्य घटनास्थळी दिसून आले. पोलिसांनी मृताची ओळख पटविली. त्याचे नाव सुरेश उंबरकर असल्याचे समोर आले. ही माहिती मृताच्या नातेवाइकांपर्यंत व नागरिकांना मिळताच अनेकांची घटनास्थळी गर्दी झाली.
नागरिकांनी काय सांगितले?
गेल्या काही दिवसांपासून सुरेश हा हेडगेवार रुग्णालयासमोरील ऑम्लेट सेंटरवर काम करीत होता. लग्नानंतर काही वर्षांतच त्याचा घटस्फोट झाला होता. मंगळवारी रात्री तो मित्रासोबत कैलासनगर येथे दिसला होता, असे घटनास्थळी आलेल्या लोकांनी सांगितले. त्याची हत्या कोणी केली आणि हत्येचे कारण काय? याचा शोध पोलिसांनी सुरू केला.
सासरच्या सततच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने संपवलं आयुष्य, पैशांसाठी देत होते त्रास
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने सासरकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना पैठण तालुक्यातील नांदर गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या, सोलापूर येथील घटना