crime (फोटो सौजन्य: social media )
छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आला आहे. यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचे समोर आले आहे. आईचे ११ तोळे दागिने आणि एक लाख ५५ हजाराची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रेयसीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगेश विलास आणि १९ वर्षीय तरुणी असे आहे. मंगेशचा मित्र कुणाल केरकरला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
नवऱ्याशी भांडण, पत्नीची कॅनॉलमध्ये उडी; धाडसी पोलिस मार्शलने वाचवले प्राण
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ५८ वर्षीय महिला या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहे. शनिवारी रक्षाबंधन असल्याने त्यांच्या मुलाने आईकडे वापरण्यासाठी सोन्याची अंगठी मागितली. तेव्हा महिलेने कपाटात पहिले तेव्हा दागिन्यांच्या सर्व डब्या रिकाम्या होत्या. तसेच १ लाख 55 हजाराची रोकड देखील गायब असल्याचे दिसून आले. यावेळी तरुणीला विचारपूस केली असता तेव्हा तिने सर्व दागिने दोन महिन्यापूर्वीच रुमालात गुंडाळून दिल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेला मोठा धक्का बसला. तिने सोमवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.तक्रारीवरून मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने तरुणीकडे पैशाची गरज असल्याचे सांगून तिच्याकडे पैशाची मागणी केली होती. प्रेमात वेडी झालेलया तरुणीने स्वतःच्या आईचे दागिने रुमालात गुंडाळले. एका रात्री तिने दोरी बांधून बकेटमध्ये दागिने टाकून खाली सोडले. ते दागिने संशयित आरोपीने त्याचा मित्र कुणालच्या मदतीने घेतले होते. त्याने दागिन्यांचे काय केले हे अद्यापही समोर आलेले नाही. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
प्रेयसीने दिलेलं दागिने कोणते?
प्रत्येकी 24 आणि 21 ग्रामच्या 2 चैन, 3 ग्रामची कानातील रिंग, 10 ग्रामचे सोन्याचे नाणे, प्रत्येकी 10 ग्रामच्या 3 अंगठ्या, 4 ग्रामचे सोन्याचे पदक, अडीच ग्रामची रिंग, 2 ग्रामची अंगठी, सोन्याच्या 3 ग्रॅमच्या बाळ्या, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, 10 ग्रामचे कानातले जोड, चांदीची अंगठी आणि 1 लाख 55 हजार रुपये हे दागिने प्रेयसीने कर्जबाजारी प्रियकराला दिले.
दुचाकीस्वार चोरट्यांनी दाम्पत्याला लुटले; अंगावरील दागिने काढायला सांगितले अन्…
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी एका दाम्पत्याला अडवून त्यांना पुढे चेकींग सुरू असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ते हातचालाखीने चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे.वारजे माळवाडी येथील हरीभाऊ पाटलू चौधरी चौकात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे रस्त्यावर चोऱ्या करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे.
गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…