
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
पैठण तालुक्यातील पाटेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात चार दिवसांपूर्वीच एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. पोत्यात गुंडाळलेला हा मृतदेह दोरीने हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह बेवारस असल्याने हा मृतदेह कोणाचा हे शोधणे कठीण झाले होते. पोलिसांनी आपला तपास पथक सक्रिय केले. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासले. आजूबाजूच्या गावात चौकशी केली. तपासादरम्यान पैठण पोलीस हे शेवगाव पोलिस ठाण्यात गेले. अंमलदार बलवीरसिंग बहुरे यांनी समयसूचकता दाखवत जवळील कारागृहातील काही कैद्यांना मृतदेहाचे छायाचित्र दाखवले. त्यापैकी एका कैद्याने मृत व्यक्ती कृष्णा असल्याची माहिती दिली. यामुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हा मृतदेह गदेवाडी येथील कृष्णा पंढरीनाथ धनवडे (वय 38) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी कृष्णा पंढरीनाथ धनवडे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. कृष्णा हे मूकबधीर होते. ते अनेकदा घरातून निघून जात असत आणि दीर्घकाळाने परतत असत. मोबाईल फोन नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ताची तक्रारही दिली नव्हती. कृष्णा हा दारूच्या नशेत आई-वडील, मूकबधीर बहिण आणि बाळंतपणासाठी घरी आलेल्या भाचीला मारहाण करत असल्याचे उघड झाले. या सततच्या त्रासामुळे घरात तणावाचे वातावरण होते. यावरून पोलिसांना कृष्णाच्या भाचे-जावई सागर रामेश्वर केसापुरे (वय 20, रा. देऊळगाव राजा) यांच्यावर संशय बळावला.
आरोपीला अटक
पोलिसांनी देऊळगाव राजा येथे जाऊन सागर केसापुरे याला ताब्यात घेतले. चौकशीत सागरने गुन्ह्याची कबुली दिली. १५ डिसेंबरच्या रात्री तो सासरी गेला तेव्हा झोपेत असलेल्या कृष्णाचा मित्र ऋषिकेश गायकवाड (वय 22, रा. दुधड) आणि एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून गोदावरी नदीत टाकण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: पैठण तालुक्यातील पाटेगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात.
Ans: भाचा-जावई सागर केसापुरे, त्याचा मित्र व एक अल्पवयीन.
Ans: कौटुंबिक वाद व सततच्या त्रासातून हत्या झाल्याचा पोलिसांचा निष्कर्ष.