Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

शनिवार, ७ रोजी जिल्हाभरात मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी दिवसभरात काही ठिकाणी वाद, गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोपांचे प्रकार पाहायला मिळाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 04:03 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान
  • भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या भावी कारभाऱ्यांसाठी शनिवार, ७ रोजी जिल्हाभरात मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी दिवसभरात काही ठिकाणी वाद, गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोपांचे प्रकार पाहायला मिळाले. आ. विलास भुमरे यांचा मुलांसह मतदान केंद्रात प्रवेश, सिल्लोडमध्ये धक्काबुक्की, वाळूजमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, बोगस मतदान असे प्रकार घडले.

सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, थंडीमुळे मतदानाची गती हळू होती. मात्र साडेदहानंतर मतदानाने वेग घेत दिवसभरात अंदाजे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांसमोर रांगा असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावंगी हसूल, तसेच फुलंब्री तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तर पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे, उबाठा नेते अंबादास दानवे आदींनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, मतदान केंद्रांवर महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांची कुमक तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तात्काळ सदरील निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली. आत प्रवेशासाठी कोणी परवानगी दिली याची झोनल ऑफिसरकडून वस्तुनिष्ठ माहिती घेत याचा अहवाल सादर करा तसेच याची चौकशी केली जाणार असून, दोषी आढळ्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. तर खा. संदीपान भुमरे यांनी, आपण सर्वजण मतदानाला कुटुंबासोबत जात असतो, तरीही मी बाहेर असल्याने या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन सांगेल, म्हणत अधिक बोलणे टाळले.

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर

सिल्लोडमध्ये धक्काबुक्की, काही काळ तणाव

सिल्लोड तालुक्यातील एका मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले, या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळासाठी मतदान प्रक्रिया मंदावली होती, मात्र नंतर पुन्हा सुरळीत सुरू झाली.

आ. भुमरे यांचा मुलांसह मतदान केंद्रात प्रवेश

पाचोड परिसरातील मतदान केंद्रावर आ. विलास भुमरे हे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मतदान केंद्रात गेले, अशी घटना समोर आली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आ. भुमरेसह मुलाच्या बोटालाही मतदान कर्मचाऱ्याने शाई लावल्याचे तसेच मुलासह आ. भुमरे हे मतदान कक्षातदेखील एकत्र गेल्याचे देखील व्हिडिओत दिसत आहे. मतदानाच्या गोपनीयतेबाबत नियमभंग झाल्याचेही बोलले जात आहे. विरोधी पक्षांकडून हे प्रकरण उचलून धरण्याची शक्यता असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. अद्याप याबाबत तक्रार दाखल नसल्याने निवडणूक विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वाळूजमध्ये तांत्रिक बिघाड

वाळूज परिसरातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले. मशीन बंद पडणे, मत नोंद न होण्याच्या तक्रारी यामुळे मतदारांमध्ये असंतोष दिसून आला. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू ठेवल्याचे प्रक्रिया पुढे सुरळीत सुरु झाली.

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Web Title: In sambhaji nagar district an average of 65 voting took place the fate of the prospective leaders has been sealed in the evm machines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Land Fraud News: बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री! उपनिबंधकांची फसवणूक; १५.३० लाखांच्या व्यवहारात बोगस कागदपत्रे
1

Land Fraud News: बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री! उपनिबंधकांची फसवणूक; १५.३० लाखांच्या व्यवहारात बोगस कागदपत्रे

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली
2

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली

LPG Gas Crisis: गॅस टंचाईमुळे पुन्हा येणार ‘रॉकेल युग’! शासनाचा मोठा निर्णय, पण परवानाधारकांमध्ये निरुत्साह; वाचा काय आहे कारण?
3

LPG Gas Crisis: गॅस टंचाईमुळे पुन्हा येणार ‘रॉकेल युग’! शासनाचा मोठा निर्णय, पण परवानाधारकांमध्ये निरुत्साह; वाचा काय आहे कारण?

Chhatrapati Sambhajinagar News: गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद! वाहतूककोंडी टाळण्यासाठी निर्णय; पर्यायी व्यवस्था करून देणार
4

Chhatrapati Sambhajinagar News: गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद! वाहतूककोंडी टाळण्यासाठी निर्णय; पर्यायी व्यवस्था करून देणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.