Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी…..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 12, 2025 | 08:48 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबाराची एक घटना समोर आली आहे.
टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला या वादात अचानक गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. आरोपीला तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत घाटगे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भरात घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारी झाली.
या हाणामारी दरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून असलेल्या पिस्तूलमधून अचानक गोळी भरत घाटगे यांच्या दिशेने सुटली, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. गोळीबारानंतर आरोपी कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कर्मचाऱ्यांकडे पिस्तूल आले कुठून?

याप्रकरणी पोलिसांनी ‘समृद्धी’च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पिस्तूल दोन कर्मचाऱ्यांकडे कुठून आले, यासंदर्भात देखील चौकशी सुरू आहे.

पुण्यातील नामांकित कंपनीला तब्बल सव्वा दोन कोटींचा गंडा
पुणे : इटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल पाठवून पुण्यातील नऱ्हे भागातील एका नामांकित कंपनीची तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. कंपनीची इटलीतील ऑटोमोबाईल कंपनीशी करारानुसार देवाण-घेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ५२ वर्षीय संचालकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सायबर चोरट्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी ते १० जून २०२५ या कालावधीत ही फसवणूक घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या कंपनीचा इटलीतील एका कंपनीशी ऑटोमोबाईल पार्ट्स उत्पादनासाठी मशीन खरेदीचा करार झाला होता. त्यानुसार, ठरलेल्या अटींनुसार काही टप्प्यांमध्ये पेमेंट केले जाणार होते. दोन वेळा पेमेंट प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. मात्र, तिसर्‍या टप्प्यातील रकमेच्या पेमेंटवेळी सायबर गुन्हेगारांनी इटलीतील कंपनीच्या अधिकृत ई-मेलसारखा नावात साधर्म असलेला बनावट ई-मेल तयार करून पुण्यातील कंपनीशी संपर्क साधला.
त्यात यापूर्वी पेमेंट केलेल्या खात्याव्यतिरिक्त दुसरे बँक खाते आणि अधिकार्‍यांची सही असलेले इन्व्हॉईस पाठवण्यात आले. यावर विश्वास ठेवून कंपनीने नवीन साईटवर तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये ट्रान्सफर केले. युरो चलनामध्ये ही रक्कम पाठविण्यात आली. मात्र, मूळ कंपनीकडून पैसे मिळाले नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले.
1500 हिंदू मुलींचं धर्मांतराचं रॅकेट, स्वत:ची कमांडो फोर्स अन् मुलींची फसवणूक…., छांगूर बाबा प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासे

Web Title: Chhatrapati sambhajinagar firing at the toll booth of samruddhi highway an employee was shot directly in the stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
4

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.